लिलुपे नदी
Appearance
लिलुपे (जर्मन: कुरलांडिश आ) मध्य लात्व्हियामधील एक नदी आहे. त्याची लांबी ११९ किमी (७४ मैल) आहे. मेमेले नदीला लिलुपेची उपनदी धरल्यास ही लांबी ३१० किमी (१९० मैल) होते. लिलुपेचे पाणलोट क्षेत्र १७,६०० चौ. किमी (६,८०० चौ. मैल) आहे. [१] लिलुप नदी सरासरी १ किमी अंतरात १० सेमी खाली उतरते. नदीचा सरासरी प्रवाह १०६ घन मी/से (३,७०० घन फूट/से) आहे. हा प्रवाह पूर आलेला असताना कमाल १,३८० घन मी/से (४९,००० घन फूट/से) पर्यंत पोहोचला आहे.