लिंकन मेमोरियल
Jump to navigation
Jump to search

अब्राहम लिंकन यांचा भव्य पुतळा (१९२०)
लिंकन मेमोरियल हे संयुक्त राज्य अमेरिकेचे १६ वे राष्ट्रपती व अमेरिकी नागरी (यादवी) युद्धाच्या दरम्यान देशाचे नेतृत्व केलेल्या अब्राहम लिंकन, यांच्या सन्मानाप्रित्यर्थ बांधण्यात आले आहे. हे स्मारक वॉशिंग्टन, डी.सी. मधील नॅशनल मॉल येथे असून ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
याचे बांधकाम इ.स. १९१४ साली सुरु होऊन १९२२ साली ते देशाला अर्पण करण्यात आले. अब्राहम लिंकन यांचा डॅनियल चेस्टर फ्रेंच या शिल्पकाराने बनवलेला १९ फूट उंचीचा भव्य पुतळा येथे आहे.