Jump to content

लावसटीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लावसटीन महाराष्ट्रातील, विशेषतः कोकणातील लोकवायकांनुसार ज्या स्त्रियांचे बाळंतपणात किंवा बाळंतपणानंतर काही काळातच अकाली मृत्यू होतो, त्यांचा आत्मा 'लावसतीन' होतो असे मानले जाते. आपल्या मुलाबद्दल असलेल्या अतृप्त ओढीमुळे हा आत्मा मानवी वस्तीच्या आसपास वावरतो, अशी समजूत आहे.

लावसटीन ही साधारणपणे पांढरी साडी नेसलेली दिसते. गोव्यातील काही भागात हिला लांब केस असलेली आणि हातात बाळ घेतलेली स्त्री असेही मानले जाते. असे मानले जाते की, ही रात्रीच्या वेळी एकटी फिरणाऱ्या पुरुषांना आपल्या सौंदर्याने भुरळ पाडते आणि त्यांना निर्जन ठिकाणी नेऊन त्रास देते. दुपारची कळवेळ (भर दुपार) आणि मध्यरात्री ही अधिक सक्रिय असते, अशी आख्यायिका आहे. ग्रामीण भागात लावसटीनीचा त्रास होऊ नये म्हणून अनेकदा विशिष्ट झाडांना किंवा घराच्या कोपऱ्यात खण-नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वी होती.

ही हडळ किंवा डाकीण या प्रकाराशी मिळतीजुळती संकल्पना आहे.