लक्ष्मी सहगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लक्ष्मी सेहगल या पानावरून पुनर्निर्देशित)
लक्ष्मी सहगल

लक्ष्मी एस. स्वामीनाथन तथा लक्ष्मी सहगल (२४ ऑक्टोबर, इ.स. १९१४- २३ जुलै, इ.स. २०१२) लक्ष्मी सहगल पेशाने डॉक्टर होत्या. १९४३ साली त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांना इ.स. १९९८ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार या सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले होते.

या आझाद हिंद सेनेच्याच्या झाशी राणी पथकाच्या प्रमुख कॅप्टन होत्या. १९४३ ऑक्टोबर मध्ये यांना सुभाषचंद्र बसू यांच्या आझाद हिंद सेनेच्या महिला पथकाचे प्रमुख पद देण्यात आले.

या पथकात त्या वेळी १८५ स्त्री सैनिक होत्या. हा आकडा नंतर २ हजार वर पोचला. पिस्तूल,बंदूक,मशीनगन्स यासारखी शास्त्रे वापरण्याचे शिक्षण या स्त्रीयांना दिले जाई.प्रारंभी या स्त्रियांना शुश्रूषा पथकात काम करण्याची संधी दिली जात असे. पण नंतर लक्ष्मी यांच्या विनंतीवरून सुभाष बाबू यांनी महिलांच्या दोन पथकांना आघाडीवर जाण्यास संधी दिली आणि हिंदुस्थान आणि ब्रह्मदेश यांच्या आघाडीवर झालेल्या युद्धात या स्त्रियांनी विजय मिळविला. नंतर आझाद हिंद सेना माघार घेत असता यांच्या फौजेने निकराचा लढा दिला आणि सुभाष बाबू यांना निसटून जाण्याची संधी दिली व मगच या ब्रिटीशांना स्वाधीन झाल्या. युद्धाच्या अखेरीला या जखमी सैनिकांची सेवा करीत होत्या त्यामुळे त्यांच्यावर खटला न भारता त्यांना सोडून देण्यात आले.[१]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Bose Gandhi 1938
  1. भारतवर्षीय अर्वाचीन चरित्र कोश - चित्राव सिद्धेश्वर शास्त्री