लक्ष्मीमल सिंघवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लक्ष्मीमल सिंघवी (नोव्हेंबर ९, इ.स. १९३१-ऑक्टोबर ६, इ.स. २००७) हे प्रख्यात कायदेतज्ञ होते. ते इ.स. १९६२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील जोधपूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९७ या काळात भारताचे इंग्लंडमधील राजदूत होते. त्यांना इ.स. १९९८ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. तसेच ते इ.स. १९९८ ते इ.स. २००४ या काळात राज्यसभेत भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते.