लक्ष्मीबाई गणेश अभ्यंकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लक्ष्मीबाई गणेश अभ्यंकर (इ.स. १८८४ - २० सप्टेंबर १९६९) या मराठी कवयित्री, कथालेखिका, कीर्तनकार, समाज कार्यकर्त्या आणि प्रभावी वक्त्या होत्या. या लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांच्या नात होत.

या गोखल्यांचे चरित्रकार आणि सांगलीचे ख्यातनाम वकील गणेश अभ्यंकर यांच्या त्या पत्नी होत. अभ्यंकरांचेचे शिक्षण शाळा कॉलेजात झाले नाही. घरीच थोरामोठयांच्या कडून त्यांनी मराठी, इंग्रजी, आणि संस्कृत या भाषांचा अभ्यास केला. तथापि, लक्ष्मीबाईंना लिखाणाची प्रेरणा विवाहानंतर पतीकडून मिळाली. त्यांची पहिली कविता मासिक मनोरंजनमध्ये प्रसिद्ध झाली. पुढे करमणूक आणि मनोरंजनमधूनही त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांच्या नावावर अनेक स्फुट कविता व संकीर्ण लेख आहेत. त्यांच्या लिखाणातून त्यांनी तत्कालीन कौटुंबिक व स्त्री जीवनांशी संबंधित अशा अनेक प्रश्नांना हात घातला.

पुस्तके[संपादन]

  • इंदिरा (काव्य)
  • धनुष्यकोट (काव्य)
  • पारिजात (काव्य)
  • सद्यःस्थिती (कथासंग्रह)