Jump to content

रोशन जफर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Roshaneh Zafar (es); روشانے ظفر (ur); Roshaneh Zafar (nl); Зафар, Рошане (ru); Рошане Зафар (sah); रोशन जफर (mr); Roshaneh Zafar (sq); Рошане Зафар (ba); Roshaneh Zafar (ast); Roshaneh Zafar (en) Managing Director - Kashf Foundation (en); Managing Director - Kashf Foundation (en); ondernemer (nl) Рошане Зафар (ru)
रोशन जफर 
Managing Director - Kashf Foundation
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
शिक्षण घेतलेली संस्था
  • Yale University
  • द व्हार्टन स्कूल
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

रोशन जफर ह्या पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत. स्त्रियांना आर्थिकदृष्टया सक्षम करणे हा त्यांच्या कामाचा उद्देश आहे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानात कश्फ या संस्थेची स्थापना केली. [१] जफर ह्या व्हार्टन बिझिनेस स्कूल, पेंसिल्वेनिया विद्यापीठाच्या पदवीधर असून येल विद्यापीठातून त्यांनी विकास अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवीही घेतली आहे.

पार्श्वभूमी[संपादन]

पाकिस्तानातील वेगाने वाढत असलेली लोकसंख्या १४० दशलक्ष पर्यंत पोचली आहे आणि लोकसंख्येच्या वाढीबरोबरच सकल राष्ट्रीय उत्पादन हे देखील प्रश्नांकित आहे. पाकिस्तान जगातील "कमी कमाईच्या अर्थव्यवस्थेच्या" श्रेणीत आहे. प्रति व्यक्तिमागे त्यांचे उत्पादन आणि उत्पन्न याचा स्तर इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स या देशांच्या तुलनेत अर्ध्याहून कमी आहे. ग्रामीण भागात प्रामुख्याने सामूहिक शेती केली जाते. ग्रामीण भागात पोहोचतात आणि मूलभूत आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध असतात. ग्रामीण भागातील महिलांची परिस्थिती याहून बिकट आहे. महिलांना त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या मुलांसाठी चांगले जीवन आणि संधी शोधण्यासाठी खूपच अडथळे येतात. ग्रामीण स्त्रियांसाठी साक्षरता दर अत्यंत कमी आहे. उपलब्ध असलेल्या अनेक शैक्षणिक संधी केवळ पुरुषांना मिळतात. त्यांच्या सांस्कृतिक परंपरा जशा त्याला अनुकूल नाहीत तसेच इतर आर्थिक स्त्रोतांपर्यंत पोहोचणे देखील अवघड आहे. अशा पार्श्वभूमीवर स्त्रिया व मुलींसाठी प्रशिक्षण देणे, त्यांना अर्थसहाय्य करणे आणि आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी कश्फ काम करते. तिच्या देशात महिलांना रोजगाराच्या मर्यादित संधी असताना तिच्या कार्यालयात फक्त महिलाच काम करतात हे देखील विशेष आहे.[२]

कामगिरी[संपादन]

बांग्लादेशातील सूक्ष्मवित्त या विषयातील प्रणेते महंमद युनूस यांच्याशी संपर्क साधून जफर यांनी कामाला सुरुवात केली. ग्रामीण भागांमध्ये गरीब महिलांना नवीन आर्थिक संधी देण्यासाठी मायक्रो-क्रेडिट प्रोग्राम्स हे एक महत्त्वाचे साधन आहे अशी रोशन झफर यांना खात्री पटली. त्यांच्या संस्थेत महिलांसाठी आणि स्त्रियांसाठी घरगुती, सूक्ष्म-स्तरीय बँकिंग आणि कर्ज देणारी कार्ये एकत्रित केली गेली.

रोशन जफर यांनी कश्फ ही संस्था १९९६ साली सुरू केली. या संस्थेच्या त्या कार्यकारी संचालिका आहेत. संस्था सुरू करण्याआधी त्या अनेक वर्षे इस्लामाबाद येथून जागतिक बँकेसाठी पाणी आणि स्वच्छता विभागात काम करत होत्या. [३] पाकिस्तानातील काही मोजक्या लोकांना सामाजिक उद्योजकता या विषयातली आंतरराष्ट्रीय मानाची अशोका ही शिष्यवृत्ती प्राप्त झाली. जफर या त्यांच्यापैकी एक आहेत.[४]

पुरस्कार[संपादन]

पाकिस्तान येथील सूक्ष्मवित्त ‍‍‍- मायक्रो फायनान्स ‌‍ क्षेत्रातील नाविन्यपूर्ण नवकल्पनांसाठी कश्फ फाउंडेशन यांना ग्रामीण फाऊंडेशन-यूएसए यांनी मायक्रोफाइनान्स एक्सेलन्स अवॉर्ड देऊन गौरव केला. त्यांना २००५ मध्ये ९८ देशांमधून मायक्रोक्रेडिट २००५ साठीचा एजीफंड इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला. जफर यांना पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरिक पुरस्कारांपैकी एक, ताघा-ए-इम्तियाझ याने पुरस्कृत केले आहे. विकास आणि महिला सशक्तीकरण क्षेत्रात काम केल्याबद्दल त्यांना २००७ मध्ये सामाजिक उद्योजकतेसाठी स्कोल अवॉर्डही देण्यात आला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "IIP Publications". publications.america.gov. २० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.
  2. ^ "कश्फ फौंडेशन". kashf.org. २० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.
  3. ^ "GWI UPDATE 24 February 2016". Human Rights Documents Online. 2018-11-19 रोजी पाहिले.
  4. ^ "Roshaneh Zafar". Ashoka | Everyone a Changemaker (इंग्रजी भाषेत). 2018-11-19 रोजी पाहिले.