रॉयल स्टॅग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉयल स्टॅग
प्रकार व्हिस्की
उत्पादक पर्नोड रिकार्ड
वितरक पर्नोड रिकार्ड
मूळ देश भारत
Alcohol by volume बहुतेक देशांमध्ये ४२.८%
रंग व्हिस्की, सोनेरी
चव

• सुगंध: जळलेल्या लाकडासारखा, पानाचा वास • चव: मध्यम गोलाकार

• तोंडातील जाणीव: धुराचा नितळ स्पर्श
पर्याय
 • रॉयल स्टॅग
 • रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्ट
संबंधित उत्पादने
 • रॉयल चॅलेंज
 • सीग्राम इम्पीरियल ब्लू
 • सीग्राम ब्लेन्डर्स प्राइड
 • शिवास रीगल
 • सीग्राम १०० पाइपर
संकेतस्थळ Pernod-Ricard.com/Royal-Stag

रॉयल स्टॅग, ज्यास सीग्राम रॉयल स्टॅग या नावानेही ओळखले जाते. हा एक व्हिस्कीचा हा भारतीय ब्रँड आहे. ह्याची सुरुवात १९९५ मध्ये झाली होती. ही व्हिस्की जगभरातील अनेक देशांमध्ये विविध आकारात उपलब्ध आहे. आकारमानानुसार पर्नोड रिकार्डचा हा सर्वाधिक विक्रीचा ब्रँड आहे. ही व्हिस्की भारतीय धान्य आणि आयात केलेल्या स्कॉच माल्टच्या मिश्रणातून बनवली जाते. ही सहसा १ लिटर, ७५० मिली, ३७५ मिली आणि १८० मिली बाटल्यांमध्ये उपलब्ध असते. तसेच ९० मिली आणि ६० मिली बाटल्यांमध्ये देखील उपलब्ध आहे. या ब्रँडचे नाव हरणाच्या शिंगावरून ठेवले गेले आहे. तसेच त्याच्या लोगोमध्ये हे दिसतात. ही व्हिस्की अनेक कंपनी-मालकीच्या तसेच बाटल्या बनवणाऱ्या कंपनी-मालकीच्या डिस्टिलरीजमध्ये तयार केली जाते. हा व्हिस्कीचा भारतातील पहिला ब्रँड होता ज्यात कोणत्याही कृत्रिम चवीचा वापर केलेला नव्हता. पर्नोड रिकार्डने रॉयल स्टॅग बरोबर सीग्राम इम्पीरियल ब्लू, सीग्राम ब्लेंडर प्राइड, शिवास रीगल आणि सीग्राम १०० पाईपर्स असे कंपनीचे पाच मुख्य ब्रांड्स चालु केले. रॉयल स्टॅगने २०११ मध्ये भारतात १.२३ करोड बाट्ल्या विकल्या. ॲब्सोलुट वोदकाला मागे टाकत, त्याच्या अल्कोहोलिक पेय पदार्थांच्या जागतिक पोर्टफोलिओमध्ये पेरनोड रिकार्डचा सर्वात मोठा विक्री करणारा ब्रँड बनला. रॉयल स्टॅगने २०१६ मध्ये १.८ करोड बाट्ल्या विकल्या.

इतिहास[संपादन]

सीग्राम रॉयल स्टॅग व्हिस्की 1995 मध्ये सुरू झाली होती.[१][२][३] या ब्रॅण्डने गुळांचा वापर न करता त्याऐवजी स्कॉच माल्ट्ससह धान्य मिसळुन एक नवीन पद्धत चालु केली. लांब शिंग असणाऱ्या हरणांच्या प्रजातीचे चित्र याचा लोगो आहे. याच्या नावातही स्टॅग हे त्याचेच प्रतिनिधित्व करते.[४][५] हा व्हिस्कीचा भारतातील पहिला ब्रँड होता ज्यात कोणत्याही कृत्रिम चवीचा वापर केलेला नव्हता.[६][७] ही व्हिस्की हे इतर धान्ये आणि आयात केलेल्या स्कॉच माल्टचे मिश्रण आहे.[६] सीग्रामचा जागतिक व्यवसाय डिसेंबर २००० मध्ये पर्नोड रिकार्ड आणि डिएगो या दोघांनी एकत्रित खरेदी केला. नंतर दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या दरम्यान अगोदरच झालेल्या स्वाक्षरी करारानुसार सीग्रामच्या व्यवसायाचे विभाजन केले.[८][९]

२००१ च्या वर्षामध्ये रॉयल स्टॅग दरमहा १,२५,०००हून अधिक युनिट्स विकत होता.[१०] आणि २००२ मध्ये सुमारे १.७५ दशलक्ष युनिट्स विकली.[११] २००४ च्या वर्षात या ब्रँडची वार्षिक विक्री ३ दशलक्षांच्या पुढे गेली.[१२] आणि २००६ मध्ये ती सुमारे ४ दशलक्षच्याही पुढे वाढली.[१३] इम्पॅक्ट इंटरनॅशनलच्या २००८ च्या "सर्वात छाने १०० ब्रँड्स"च्या यादीत रॉयल स्टॅग भारतीय स्पिरिट्स ब्रँडमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याची रिटेल व्हॅल्यू ५०५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती.[१४] २००९ मध्ये या ब्रँडने ८ दशलक्ष आणि २०१० मध्ये जवळपास १०.६ दशलक्ष युनिट्सची विक्री नोंदविली.[१५] रॉयल स्टॅगने २०११ मध्ये १२.३ दशलक्ष युनिट्स विकली आणि तोपर्यंत ११.३ दशलक्ष युनिट्स विकणारी अ‍ॅब्सोलुट वोडकाला मागे टाकले आणि जागतिक स्तरावरील अल्कोहोलयुक्त पेय पदार्थांमध्ये पेरनोड रिकार्डचा सर्वात मोठा विक्रीचा ब्रँड बनला.[१६]

पर्नॉड रिकार्डने रॉयल स्टॅगची प्रीमियम आवृत्ती, रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट नावाची डिसेंबर २०११ मध्ये भारत, आखाती आणि इतर काही आशियाई बाजारात बाजारात आणली.[१७] भारतीय व्हिस्की मार्केटमध्ये बॅरल सिलेक्ट अनुक्रमे कंपनीच्या रॉयल स्टॅग आणि ब्लेंडर प्राइड ब्रँड्सच्या ताब्यात असलेल्या डिलक्स आणि प्रीमियम सेगमेंट दरम्यान स्थित आहे.[१८] युनायटेड किंग्डम-आधारित ब्रँडिंग आणि पॅकेजिंग सल्लागार कार्टिल्स यांनी बॅरेल सेलेक्टसाठी धोरणात्मक स्थिती, ब्रँडिंग, बाटलीचा आकार, पॅकेजिंग आणि मोनो कार्टन विकसित केले. कार्टिलला वाटले की पोर्टफोलिओचे नुकसान टाळण्यासाठी बॅरल सिलेक्टला रॉयल स्टॅगपेक्षा अधिक प्रीमियम पातळीवर उंचावणे आवश्यक आहे तसेच ब्रँडची ओळख जपणेही आवश्यक आहे. बॅरल सिलेक्ट बाटलीचा आयताकृती आकार रॉयल स्टॅग प्रमाणेच आहे, परंतु त्याला थोडे थोडे टेपर केलेले आहे. बाटलीमध्ये रॉयल स्टॅग लोगोचा एक भाग असलेल्या स्टॅगची प्रभावीपणे स्थिती असलेल्या सोनेरी दोन-रंगातील चित्रण देखील केलेले आहे.[१९][२०][२१]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Seagram Company Ltd. | Canadian company". Encyclopædia Britannica. Encyclopædia Britannica. Archived from the original on 7 सप्टेंबर 2015. 17 जानेवारी 2016 रोजी पाहिले.
 2. ^ "Pernod Ricard India set to take over Seagram's local operations this week". The Financial Express. 12 फेब्रुवारी 2002. Archived from the original on 22 फेब्रुवारी 2014.
 3. ^ "McDowell's No.1 Platinum advertisement featuring MS Dhoni takes a dig at Royal Stag". The Economic Times. 24 June 2011.
 4. ^ "Royal Stag | Royal Stag". Royalstagwisky.wordpress.com. 24 जुलै 2008. Archived from the original on 4 मार्च 2016. 14 जानेवारी 2016 रोजी पाहिले.
 5. ^ "Seagram's Royal Stag-Deluxe Whiskey". Himalayandistillery.com. 10 ऑक्टोबर 2000. Archived from the original on 4 मार्च 2016. 14 जानेवारी 2016 रोजी पाहिले.
 6. ^ a b prince mathews thomas (2015-07-10). "A case of reverse snobbery | Business Line". Thehindubusinessline.com. 2016-01-14 रोजी पाहिले.
 7. ^ Our Bureau (2011-05-31). "Standards council finds 34 ads misleading | Business Line". Thehindubusinessline.com. 2016-01-13 रोजी पाहिले.
 8. ^ Kapner, Suzanne (20 डिसेंबर 2000). "Diageo and Pernod Buy and Divide Up Seagram Beverage Assets". NYTimes.com. Archived from the original on 5 मार्च 2016. 14 जानेवारी 2016 रोजी पाहिले.
 9. ^ "Pernod Ricard to acquire Seagram Spirits & Wine jointly with Diageo". Prnewswire.co.uk. 20 डिसेंबर 2000. Archived from the original on 21 फेब्रुवारी 2014.
 10. ^ Arshdeep Sehgal (20 November 2001). "Desi whiskies go classy". The Economic Times.
 11. ^ "Seagram among top-5 IMFL cos". The Hindu Business Line. 17 डिसेंबर 2003. Archived from the original on 24 जुलै 2008. 13 जानेवारी 2016 रोजी पाहिले.
 12. ^ "Seagram identifies 5 core brands to build spirits biz". Business Line. 31 मार्च 2005. Archived from the original on 24 डिसेंबर 2013.
 13. ^ M Padmakshan (23 October 2006). "Seagram to roll out locally made wines". The Economic Times.
 14. ^ Boby Kurian (5 March 2009). "McDowell's in top10 global spirits league". The Economic Times.
 15. ^ "Royal Stag, Officer's Choice challenge Mallya's empire". The Times of India. 16 डिसेंबर 2010. Archived from the original on 19 डिसेंबर 2010.
 16. ^ "Royal Stag topples Absolut Vodka to lead volume chart in Pernod's portfolio". The Economic Times. 10 February 2012.
 17. ^ "Pernod Ricard India raises local whiskey price bar". Thedrinksbusiness.com. 3 जानेवारी 2012. Archived from the original on 16 जून 2013.
 18. ^ Sarah Jacob (30 December 2011). "Pernod Ricard India rolls out costliest whisky in India – Economic Times". The Economic Times.
 19. ^ "Royal Stag". Pernod Ricard. Archived from the original on 22 जून 2013.
 20. ^ "Royal Stag Barrel Select". The Dieline. 7 मार्च 2012. Archived from the original on 13 मे 2013.
 21. ^ "New packaging, New Royal Stag. New Blenders Pride". Startingmonday.co.in. 30 जून 2012. Archived from the original on 25 मार्च 2013.