रॉबिन गिव्हेन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉबिन सिमोन गिव्हेन्स (२७ नोव्हेंबर, १९६४:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही एक अमेरिकन दूरचित्रवाणी, चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहे. हिने द कॉस्बी शो आणि डिफ्रंट स्ट्रोक्स या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय केला. गिव्हेन्सने ब्लँकमन, हेड ऑफ स्टेट आणि द फॅमिली दॅट प्रेज सह २० पेक्षा अधिक चित्रपटांतून कामे केली आहेत.

गिव्हेन्स १९८८-८९ दरम्यान मुष्टियोद्धा माइक टायसनची पत्नी होती. तिने १९९७-९८ दरम्यान आपल्या टेनिस प्रशिक्षक स्वेतोझार मारिंकोविचशी लग्न केले होते. गिव्हेन्सला एक दत्तक आणि एक अभिजात मुले आहेत.