रॉबर्ट हॅमरलिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉबर्ट हॅमरलिंग (२४ मार्च, इ.स. १८३०:किर्चबुर्ग आम वाल्ड, खालचे ऑस्ट्रिया, ऑस्ट्रिया - १३ जुलै, इ.स. १८८९:ग्राझ, ऑस्ट्रिया) हा ऑस्ट्रियन कवी आणि लेखक होता.

१८४८मध्ये हा स्टुडंट्स लीजनमध्ये शामिल झाला व व्हियेनामधील उठावात त्याने सक्रिय सहभाग घेतला होता. हा उठाव असफल झाल्यावर त्याने तत्त्वज्ञान आणि नैसर्गिक विज्ञानाबद्दल लेखन केले. १९११ च्या एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकानुसार हॅमरलिंग आधुनिक ऑस्ट्रियामधील सर्वोत्तम साहित्यिकांपैकी एक होता.