रेखांकित भारीट
रेखांकित भारीट किंवा रेघांची रेडवा (इंग्रजी: Striolated Bunting; तेलुगू: चारल गंधम पिट्ट) हा एम्बेरिझिडे या भारीट कुळातील पक्षी आहे.
ओळखण
[संपादन]हे पक्षी आकाराने चिमणीपेक्षा लहान असतात. नरांचा माथा राखट पांढरा असतो व त्यावर काळसर रेघा असतात. त्यांची भुवई पांढरी असते. डोळ्यांमागे काळसर पट्टा असतो. वरील भाग तपकिरी व त्यावर गर्द रंगाच्या रेषा असतात. पंख तांबूस असतात. कंठ व छाती राखट पांढरी व त्यावर काळ्या रेघा असतात. पोट मातकट असते.
मादी दिसायला नारासारखीच असते. मात्र डोके व कंठ तपकीरी रंगाचे असून, त्यावर गर्द रंगाच्या रेघा असतात.
वितरण
[संपादन]रेखांकित भारीट पक्षी पाकिस्तानातील बलुचिस्तान, सिंध, पंजाब, सॉल्ट रेंज तसेच भारताचा पूर्व व दक्षिण भाग, दक्षिण-उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशाचा मध्य भाग, तसेच महाराष्ट्राचा मध्य भाग या भागात आढळतात.
निवासस्थाने
[संपादन]हे पक्षी पाषाणयुक्त झुडूपी डोंगराळ प्रदेश, पुरातन गड, किल्ले व वास्तू अश्या ठिकाणी राहतात.
संदर्भ
[संपादन]- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली