रॅफल्स हॉटेल
रॅफल्स हॉटेल (इंग्लिश: Raffles Hotel) हे सिंगापूर शहरामधील एक आलिशान हॉटेल आहे. १८८७ साली आर्मेनियन उद्योगपत्यांनी बांधलेल्या ह्या हॉटेलला सिंगापूराचा संस्थापक थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्स ह्याचे नाव देण्यात आले आहे. ही रॅफल्स हॉटेल्स आणि रेसोर्ट्सची सर्वोत्तम दर्जाची मालमत्ता आहे व फाईर्मौंत रॅफल्स हॉटेलस इंटरनॅशनलची सहभागीदारी आहे.[१]
इतिहास
[संपादन]हे हॉटेल १८३० मध्ये बीच हाऊस बांधून प्रथम सुरू झाले. सन १८७८ मध्ये ही इमारत डॉ.चार्ल्स एममेरसोन यांनी भाड्याने घेतली आणि एममेरसोन’स हॉटेल म्हणून हे ओळखले जाऊ लागले. सन १८८३ मध्ये डॉ चार्ल्स यांचा मृत्यू झाला व हे हॉटेल बंद पडले. त्यानंतर डॉ.चार्ल्स यांचा भाडे करार संपेपर्यंत म्हणजे सप्टेंबर १८८७ पर्यंत रॅफल्स इन्स्टिट्युटने त्याचा वापर बोर्डिंग हाऊस म्हणून केला.[२]
पहीला भाडे करार संपताच सरकीस बंधूंनी ही मालमत्ता भाड्याने घेतली आणि त्याचे हाय एंड हॉटेल मध्ये परावर्तित केले. कांही महिन्यांनंतर म्हणजेच १ डिसेंबर १८८७ मध्ये त्यांनी १० खोल्यांचे हॉटेल सुरू केले. बीच जवळ असल्याने आणि या हॉटेलचे उच्चतम सेवेची प्रसिद्दी असल्याने आणि राहण्याची व्यवस्था चांगली असल्याने येथे गिऱ्हाइकात हे प्रसिद्द आहे.
या हॉटेलचे पहिले १० वर्षात मुलाच्या बीच हाऊस मध्ये नवीन तीन इमारतींची भर पडली. सन १८९० मध्ये प्रथम दोन दुमजली विंग उभारल्या, प्रतेक विंग मध्ये २२ अथीती सूट, त्यानंतर लवकरच सन १८९४ मध्ये सरकीस बंधूंनी ३ बीच रोड वरील शेजारील इमारत भाड्याने घेतली, तिचे रेंनोवेशन केले आणि पाम कोर्ट विंग पूर्ण केले. या नवीन सहभागाने या हॉटेलच्या ७५ खोल्या झाल्या.
कांही वर्षांनंतर मुळंचे बीच हाऊसचे जागेवर नवीन इमारत बांधली. तिचा आराखडा रिजेन्ट अल्फ्रेड जॉन बीडवेल्ल ऑफ स्वान आणि मकलेरिण या वास्तुविशारदाणी बनविलेला होता. ही इमारत १८९९ मध्ये पूर्ण झाली. या मुख्य इमारतीत त्या देशातील विविध प्रकारच्या कलाकुसरीची वैशिष्टे रेखाटली होती. तसेच त्यात विध्युत पंखे आणि लाइट्स लावलेले होते. रॅफल्स हॉटेल हे त्या विभागातील विध्युत लाइट असणारे पहीले हॉटेल होते.
सन १९८७ मध्ये म्हणजेच मूळं हॉटेल सुरू झालेल्या दिवसापासून १०० वर्षांनंतर सिंगापूर सरकारने रॅफल्स हॉटेलची राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषणा केली.[३]
ठिकाण
[संपादन]सिंगापूर शहाराचे मध्यवर्ती ठिकाणी ब्रास बासह कॉम्प्लेक्स आणि सिव्हिलयन वॉर मेमोरियल जवळ आहे. हे पंचतारांकित हॉटेल हाजी लेन आणि चायना टाऊन हेरिटेज केंद्राजवळ आहे.
सुविधा
[संपादन]या हॉटेल मध्ये १०३ वातानुकूलित खोल्या आहेत. त्यात रेफ्रीजरेटर, मिनिबार, मनोरंजनासाठी LCD टेलीविजन, इंटरनेट, बाथरूम, टॉयलेट, हेयर ड्रायर, टेलिफोन, मेज इ. सुविधा आहेत. येथे स्पा, अल्पोपअहार, भोजन, २४ तास इन व चेक आऊट, व्यवसाय केंद्र, व्हरांड्यात दैनिक, पूल, पार्किंग आहेत. येथे १५ रेस्टारंट्स आहेत.[४]
सारांश
[संपादन]या हॉटेल मध्ये बेसिक सुविधा, खानपान, व्यवसाय सेवा, वैयक्तिक सेवा, शरीर स्वास्थ्य सेवा, प्रवाशी सेवा, खोली सुविधा यांचा समावेश आहे.[५]
बाह्य दुवे
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "रॅफल्स हॉटेलची माहिती".
- ^ "रॅफल्स हॉटेल,सिंगापूरच्या विषयी".
- ^ "रॅफल्स हॉटेल - राष्ट्रीय स्मारक,सिंगापूर". 2016-04-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-03 रोजी पाहिले.
- ^ "रॅफल्स हॉटेल,सिंगापूर-सोयी आणि सुविधा".
- ^ "रॅफल्स हॉटेलच्या लॉंग बार बद्दल".