रिमांड होम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रिमांड होम हे गुन्हेगार असलेल्या आणि सुधरण्याची गरज असलेल्या बाल गुन्हेगारांना राहण्यासाठी व त्यांच्या पुढील निर्वाहासाठी सोय करणारे वसतीगृह होय. याबरोबरच काही रिमांड होममध्ये अनाथ असलेल्या मुलांना या ठिकाणी राहण्याची, शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाते. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये शासनाकडून रिमांड होम चालवली जातात. तर काही ठिकाणी एनजीओ कडून अशी रिमांड होम चालवली जातात.