रिपब्लिक एरवेझ
Appearance
(रिपब्लिक एरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख १९९८मध्ये स्थापन झालेली विमानवाहतूक कंपनी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, रिपब्लिक एअरलाइन्स (१९७९-१९८६).
रिपब्लिक एरलाइन ही अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरात स्थित विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी अमेरिकन ईगल, डेल्टा कनेक्शन आणि युनायटेड एक्सप्रेस कंपन्यांना त्यांच्या नावाखाली विमानसेवा पुरवते. रिपब्लिककडे एप्रिल २०१७ च्या सुमारास ७५ एम्ब्राएर १७० आणि ११६ एम्ब्राएर १७५ प्रकारची विमाने होती. याआधी रिपब्लिकने एम्ब्राएर १९० आणि बॉम्बार्डिये डॅश ८ क्यू४०० प्रकारची विमानेही वापरली.
रिपब्लिक एरलाइनच्या विमानांची कॉलसाइन ब्रिकयार्ड आहे.