रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे[संपादन]

1]विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला राजकीय पक्ष[संपादन]

1.1] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी[संपादन]

पोलिंग एजंट ते डेप्युटी सरपंच व डेप्युटी सरपंच ते नगरसेवक आणि नगर सेवक ते राष्ट्रिय नेता अशा आपल्या जीवनयापनाच्या प्रवासातील भारतातील राजकारणातील विविध भुमिका बजावणा-या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रिय नेते गंगाराम इंदिसे उर्फ नानासाहेब इंदिसे होय. विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन् विचारानुसार नानासाहेब इंदिसे यांनी घेतलेला युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा,तसेच भारतीय राजकारणातील रिपब्लिकन पार्टी आफॅ इंडियावर टाकलेला प्रकाशझोत

1.2] नानासाहेब इंदिसे यांचे बालपण[संपादन]

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रिय नेते नानासाहेब इंदिसे यांचा जन्म दिनांक 5/3/1942 साली धुळे जिल्हयातील तळोजा तालुक्यातील प्रतापपुर येथे झाला.त्यांचे वडील दोधा कृष्णा इंदिसे हे 1952 साली शे.का.फे.चे पुर्वीच्या खानदेश नंतरचा धुळे आणि आत्ताच्या नंदुरबार जिल्हयातल्या तळोजा या तालुक्याचे तालुका अध्यक्ष होते.त्याकाळी षे.का.फे अन् प्रजासमाजवादीचे अशोक मेहता हे होते.तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक म्हणुन अण्णासाहेब नहनकर हे देखील धुळयाचेच होते. 1952 सालच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत नानांचे वय अवघे 10वर्षे होते.परंतु हत्ती अन् वडाचे झाड या निवडणुकितील दोन निशाणी त्यांना राजकारणाचेच धडे देत होते.त्यातच नानांचे पाय राजकारणात ओढले गेले. त्या सार्वत्रिक निवडणुकितुनच बालपणीच त्यांना राजकारणाचे बालकडु चाखावयास मिळाले.वडिल व्यापारी व शेतकरी असल्याने वडिलांबरोबरच त्यांचा सतत रहिवास असल्याने व्यापारानिमित्त वडिलांबरोबरच तेही बैलगाडी अथवा घोडयावरून शहरात जात असत.त्यामुळे त्यांचे शहराविषयी आकर्षण आणखीणच वाढले.1962 साली विधानसभेच्या निवडणुकीत केशव गोविंद वळवी हे आरपीआयच्या तिकिटावर तळोजा अक्कलकुवा या मतदार संघातुन उभे होते. त्यावेळी नानासाहेबांनी त्या निवडणुकीत पोलिंग एजंटचेही काम केले. 

1.3] ठाणे येथे प्रयाण[संपादन]

नानासाहेब जुन्या अकरावी नंतर 1963 साली शहरी जिवनाच्या आकर्षणापायी ठाणे जिल्हयातील कळवा येथे स्थलांतरीत झाले. 1964 साली नानासाहेब इंदिसे हे ठाणे जिल्हयातील वाडा तालुक्यात फॉरेस्ट खात्यात नोकरीस लागले.1965ला वसईतील गोखीवरा येथे नानासाहेब इंदिसे रहावयास गेले.1966ला नानासाहेब इंदिसे पुन्हा ठाणे येथील येऊरला येऊन स्थायिक झाले.

1.4] भारतीय राजकरणात प्रवेश[संपादन]

वडिलांकडुनच बालपणा पासुन राजकारणाचे धडे मिळाल्याने नानांचे मन नोकरीत रमेना आणि 1967ला त्यांनी नोकरीचा राजिनामा देऊन राजकिय चळवळीत पूर्णवेळ सक्रिय सहभाग घेतला.ऑक्टोंबर 1966ला कर्मविर दादासाहेब गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रिय अध्यक्ष असताना रा.सु.गवई हे विद्यमान आमदार होते 1968 साली रा.सु.गवई हे उपसभापती झाले.तेव्हापासुन नानासाहेब इंदिसे यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात सक्रिय कार्य मोठया उत्साहात भरारी घेत जोमाने चालले होते.

1.5] ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच[संपादन]

1971 साली आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत माजीवडा येथे नानासाहेब इंदिसे हे डेप्युटी सरपंच झाले.1978 साली नानासाहेब इंदिसे हे माजीवडा येथे ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच म्हणुनच राजकारणात कार्यरत होते.1979ला नानासाहेब इंदिसे माजीवडा पंचायत समितीच्या निवडणुकिस उभे राहिले परंतु त्यांना अपयश आले.1985च्या ठाणे बेलापुर विधानसभा मतदार संघातुन नानासाहेब इंदिसे यांना अपयशाला सामोरे जावे लागले.

1.6 ठाणे महानगर्पालिकेवर निर्वाचित[संपादन]

1988ला नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकितही अपयशाला सामोरे जावे लागले.1992 मध्ये नानासाहेब इंदिसे यांनी ठाणे महानगर पालिकेत निर्वाचीत यश संपादन केले. नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेने परिवहन समितीचे चेअरमनपद देऊन सन्मान केला.या काळात त्यांनी अनेक गरजुंना नोकरीस लावले.त्याचा फायदा डॉक्टर, शिक्षक,बालवाडी शिक्षक,आया,कंडक्टर,ड्रायव्हर, बिगारी, शिपाई, हेल्पर,सुशिक्षीत बेरोजगार आदींचा उदरनिर्वाहणार्थ रोजगार उपलब्ध करून देऊन या पदाचा योग्य उपयोग केला.1997च्या ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत नानासाहेब इंदिसे यांना पुन्हा एकदा अपयशाला सामोरे जावे लागले.

1.7] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची स्थापना  [संपादन]

2000 सालापासुन नानासाहेब इंदिसे हे कळत नकळत ऐक्याच्या भुमीकेवर ठाम राहिले.2009 मध्ये पुन्हा माजिवडा विधानसभा मतदार संघात नानासाहेब इंदिसे यांना अपयश पचवावा लागला.निवडुन न येण्याची कारणे मला माहित होती परंतु आंबेडकरी समाज इतरांच्या दावणीला बांधला जाऊ नये या उद्येशाने विधानसभा निवडणुका लढविल्या. तदनंतर आज पर्यंत रिपाइचे वेगवेगळया गटातटाचे राजकारण चालुच आहे.त्या नंतर रिपब्लिकन पार्टीची अशी अवस्था पाहुन निळया निशाणाखाली सर्वांचे ऐक्य व्हावे याच उद्येशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन् विचारांच्या प्रेरणेतुनच नानासाहेब इंदिसे यांनी 20 डिसेंबर 2008 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची स्थापना केली.या मध्ये शिवराम मोघा,कुमारसेन बौद्ध,उत्तमराव खडसे,प्रल्हाद सोनवणे, दौलतराम आदी.निष्ठावंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतानुसार नानासाहेबांबरोबर सक्रिय कार्य करू लागले. पक्षाचे पहिले राष्ट्रिय अधिवेशन युगप्रवर्तक,विष्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभुमी महु (आंबेडकर नगर) येथे भरविण्यात आले.यामध्ये आंबेडकरी चळवळीतले बहुतांश नेते,कार्यकर्ते यांना निमंत्रीत करण्यात आले.

2] विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी व ऐतिहासिक घडामोडींचा परामर्श[संपादन]

तत्पुर्वी विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी वऐतिहासिक घडामोडींचा परामर्श खालिलप्रमाणे 20/7/1924 रोजी बहिष्कृत हितकारीणी संस्था स्थापन केली.3/3/1927 रोजी समता सैनिक दल स्थापन केले 20/3/1927 रोजी महाडचा सत्याग्रह, 26/7/1927 रोजी अंबादेवी मंदिर सत्याग्रह, 14/6/1928ला भारतीय बहिष्कृतशिक्षण मंडळ स्थापले, 22/9/1929 रोजी पर्वती पुणे सत्याग्रह,2/3/1930ला काळाराम मंदिर सत्याग्रह,4/10/1930डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृष्यांचा प्रतिनिधी म्हणुन गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला रवाना,7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931ला दुस-या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांना स्वतंत्र मतदार संघावरून गांधी आंबेडकरांत तिव्र मतभेद,23/9/1931ला मुखेडचा सत्याग्रह केला.24 सप्टेंबर 1932 पुणे करार, जानेवारी 1933 तिस-या गोलमेज परिषदेहुन भारतात रवाना,1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट लागु.13/10/1935 येवले मुक्कामी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘मी जरी हिंदु धर्मात जन्मलो तरी हिंदु धर्मात मरणार नाही’’ही घोषणा केली.15/8/1936ला स्वतंत्र मजुर पक्ष स्थापन केला.1937 मुंबई विधिमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे डॉ.आंबेडकरांसहित 14 उमेदवार निवडुन आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी पक्ष नेते होते.तर सभागृह उपनेते आर.आर.भोळे होते. या मध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे शामराव परूळेकर, करंदीकर,जमनादास मेहता,झाबवाला आदी खंदे सदस्य होते.मोठा पक्ष म्हणुन मुस्लिम लिग हा होता त्यांचे नेते सर देहलवी हे होते 12/2/1939 मोहाडी धुळे सत्याग्रह,2/7/1942ला प्रथमच एक अस्पृष्य केंद्रिय मंत्रीमंडळात मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेबांचा भारताच्या व्हाइसरॉय कार्यकारी मंडळात समावेश झाला.19/7/1942ला शेडयुल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली,27/7/1942ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मजुरमंत्रीपदाचा कारभार सोपविण्यात आला. 8/7/1945 पिपिल्स ऐज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.4/6/1946 पुणे कौन्सील मोर्चा सत्याग्रह,27/6/1946 सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना,19/7/1946डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगाल विधिमंडळातुन घटना समितीवर निवडुन आले. 3/9/1946ला नागपुर सत्याग्रह, 5/9/1946डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश पार्लमेंटच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये कॉन्झर्वेटीव्ह इंडियन कमिटी समोर पुणे करार रद्द करण्याची व ब्रिटिश सरकारचा जातिय निवाडा लागु करण्याची मागणी केली.11/12/1946डॉ.राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 2/3/1947ला लखनौ सत्याग्रह केला.15 मार्च 1947 बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘स्टेटस अॅन्ड मायनॉरिटीज’’हा ग्रंथ प्रकाशीत केला.29 एपिंल 1947 रोजी घटनेतुन अस्पृष्यता निवारण्याविषयी सतरावे कलम संमत केले. 22 जुलै 1947 रोजी भारतीय ध्वज समितीचे सदस्य म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतुन अशोक चक्रांकित तिरंगा झेडा राष्ट्रध्वज म्हणुन निश्चीत केला.23 जुलै 1947डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीवर निवड झाली.3/8/1947 भारताचे कायदा मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्रीमंडळात समावेश15ऑगष्टला1947 भारत स्वतंत्र झाला.30/8/1947ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड.26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधान भारतास अर्पण,8 मे 1950 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणुन शपथ घेतली.26 जानेवारी 1950ला भारतीय प्रजासत्ताक दिन. या दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासारख्या खंडप्राय देशात राज्यघटनेद्वारे लोकभिमुख लोकशाही पेरली सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे महत्त्व पटवुन ‘‘एक व्यक्ती,एक मुल्य,एक मत’’ याचा सिद्धांत घटनेत मांडुन सर्वांना एका किंमतीत आणले,त्याच बरोबर न्याय,स्वातंत्र्य,समता मैत्रीबंधुत्व ही नितीतत्त्वे राज्य घटनेच्या माध्यमातुन लोकशाही बळकट होण्यासाठी रूजवली अन् भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. 5 फेब्रुवारी 1951डॉ..आंबेडकरांनी हिंदु कोड बिल लोकसभेत मांडले.27 सप्टेंबर हिंदुकोड बिल फेटाळल्याच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा त्याग केला.5 जानेवारी 1952 मुंबई लोकसभेत अपयश9 मार्च 1952डॉ. आंबेडकरांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. मे 1954 भंडारा लोकसभेच्या राखिव मतदार संघातील पोटनिवडणुकित अपयश आले.1954ला भारतीय बौद्धमहासभेची स्थापना केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत खोती बिल, महार वतन बिल, हिंदुकोड बिल, मंत्र्यांचे वेतन बिल, लोकप्रतिनिधि बिल,कामगारांचे किमान वेतन बिल सादर केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 13ऑक्टोंबर 1935 साली येवले मुक्कामी हिंदुधर्म त्यागाची चळवळ हाती घेऊन केलेल्या भिष्मप्रतिज्ञेच्या अनुशंगाने21वर्षे सातत्याने सर्व धर्माचा अभ्यास केला.अभ्यासपुर्वक निर्णयातुन त्यांनी निसर्गनियमांना अनुसरून,विज्ञाणाचा आधार घेऊन,सत्य व वास्तव यांची सांगड घालुन सम्यक ज्ञानाची कसोटी घेऊन 14ऑक्टोंबर 1956 रोजी अशोक विजया दशमी दिनी नागपुर येथे भन्ते चंद्रमणी यांच्या कडुन स्वतः भारतातीलच असलेल्या बौद्ध धम्माची धम्मदिक्षा घेऊन आपल्या समवेत असलेल्या सुमारे पाच लक्ष अनुयायांना त्यानी स्वतः बौद्ध धम्माची दिक्षा दिली. 20 नोव्हेंबर 1956 रोजी काठमांडु येथे जागतिक बौद्ध महापरिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘बुद्ध की,कार्लमार्क्स’’या विषयावर भाषण केले असता बौद्ध महापरिषदेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ‘राजा इ मलाला’यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना‘‘बोधिसत्व’’हि पदवी तेथेच बहाल केली. 24 नोव्हेंबर 1956 रोजी सारनाथ, आग्रा आणि दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.25 नोव्हेंबर 1956 रोजी सकाळी काशी विद्यापिठातील विद्यार्थी व आचार्यगणांसमोरभाषण केले तर सायंकाळी बनारस येथे महाबोधी संस्थेच्या सभेत शेवटचे भाषण केले.

3] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली[संपादन]

रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याचा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 8/9 डिसेंबर 1955 मध्ये औरंगाबाद येथील वास्तव्यात पहिल्यांदा बोलुन दाखविला होता. भारतीय राज्य घटना ख-याखु-या अर्थाने राबविण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाला भाग पाडणे तसेच सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी सर्व लहानसहान राजकीय पक्षांचे एकीकरण करून प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन रिपब्लिकन पक्षाला प्रस्थापीत करणे हा रिपब्लिकन पक्षाचा उद्येश असल्याचे त्यांनी सांगीतले.(जनता -10 डिसेंबर 1955 ) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 29/30 सप्टेंबर 1956 रोजी 26,अलिपुर रोड दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी त्यांच्याच अध्यक्षतेखाली शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या केंद्रीय कार्यकारणीच्या बैठकीतशेकाफे बरखास्त करून ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’या नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला अन् रिपाइ अस्तित्वात आल्याची घोषणा समारोपाच्या भाषणात केली.ज्या मध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जातीविरहित,धर्मविहिन चळवळ चालवुन या देषात असणारी विभिन्न विषमता नष्ट करण्यासाठी आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्रांती घडवुन आणुन वर्गविहिन,जातीविहिन समाजव्यवस्था निर्माण करतील व समाजवादी व आर्थिक पूनर्रचना करतील अशी त्यांना अपेक्षा होती.

        डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घोषीत केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची ‘‘हत्ती’’ ही निशाणी ठेवण्यामागची भुमीका काय होती हे देखील समजावुन घेणे महत्त्वाचे आहे.हत्ती हा महाकाय प्राणी असल्याने आणि माझा समाज हा अडाणी समाज असल्याने इतर निशाणी ओळखण्यापेक्षा महाकाय हत्तीची निशाणी त्यांना तत्काळ ओळखता यावी म्हणुनच ‘‘हत्ती’’या निशाणीची निवड केली. तसेच शेडयुल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष मर्यादीत व ठरावीक जातीपुरताच असल्याने 1952च्या लोकसभेत अन् 1954च्या भंडारा मधील पोटनिवडणुकीत उच्चजातीयांनी जातीय मानसिकतेतुन शे.का.फे.ला एकटे पाडल्याने आलेल्याअपयशाच्या कारणमीमांसेने ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’प्रजासत्ताक पक्ष म्हणुन स्थापन करणे संदर्भी पक्षाची घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहुन काढली होती.या पक्षात भारतीय जनतेला सामील होण्यासाठी खुल्ले पत्रही लिहिले होते.त्यांना आपल्या या पक्षाला विशिष्ट जातीचे लेबल लावुन हा पक्ष चालवायचा नव्हता.यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत नमुद पक्षाची ध्येय,उद्यिष्ट व तत्त्वप्रणाली नमुद केलेली आपणास आढळुन येतील.भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे तीच भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या घटनेत समाविष्ट करून घटना बनविण्यात आली.
       रिपब्लिकन पक्षाचा तत्त्वज्ञानात्मक आधार,पक्षाची ध्येय,उद्दिष्टे व कार्यक्रम तसेच पक्ष सुदृढतेच्या कसोटया याचे अध्ययन केल्यास हा पक्ष भारतात अस्तित्वात असलेल्या अन्य कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा सर्वच बाबतीत सरस आहे हे दिसुन येते. मात्र पक्षाच्या या वैशिष्ट्याचीशिकवण सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहचविण्यात रिपब्लिकन पक्षाचे नेते,विचारवंत,पक्षावियी सहानूभुती असलेले बुद्धीजिवी,लेखक, सामाजिक कार्यकर्ते कमी पडले असे खेदाने म्हणावेसे वाटते. 
              दिनांक 29/30 सप्टेंबर 1956 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या बैठकीत 26 अलीपुर रोड दिल्ली येथील आपल्या राहत्या घरी केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीवादी, ब्राम्हणवादी आणि कम्युनिस्ट या तिन विचारधारांना नाकारून रिपब्लिकन नावाची निख्खळ लोकशाहीवादी चौथी राजकीय संकल्पना भारतीय राजकारणाच्या पटलावर निर्माण केली मात्र त्यांच्या घोषणेतील राजकीय कृती प्रत्यक्षात उतरविण्यापुर्विच त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दुर्देवाने परिनिर्वाण झाल्याने पक्ष स्थापनेसाठी रिपब्लिकन पार्टीचा निर्णय अस्तित्वात येऊ शकला नाही..

4] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा[संपादन]

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रिय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन् दिशा या विषयावर टाकलेल्या प्रकाशझोतात रिपाइ एक्याबाबतच्या अनेक घडामोडींचा नानासाहेबांनी घेतलेला परामर्श आपल्याला बरेचसेकाही सांगुन जातो बऱ्याच जणांना माहित असेल परंतु आजच्या पिढीला माहित व्हावे या उद्देशानेच त्याचे सिंहावलोकन करीत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणा नंतर मुंबई मध्ये दादर येथील चैत्यभुमीवर त्यांचे अंतीम संस्कार करण्यात आले.सदर प्रसंगी कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी बाबासाहेबांच्या चित्तेवर शपथ घेऊन समतेचा रथ पुढे नेईन परंतु तो तसुभरही मागे घेणार नाही. त्या प्रमाणे 29 डिसेंबर 1956 रोजी अहमदनगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची प्रेसीडियमची बैठक झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाने नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली.दुस-या फळीतील नेत्यांमध्ये नेतृत्वावरून अहमहमिका लागली.दलित चळवळीचे नेतृत्व आपल्याकडे यावे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा होती.परंतु शिल्लक राहिलेले सर्वच नेते तुल्यबळ असल्याने बाबासाहेबांच्या समवेत असणारे दादासाहेब गायकवाड, राजाभाऊ खोब्रागडे, भय्यासाहेब आंबेडकर, बी.सी.कांबळे आदी नेत्यांनी चतुराईतुन सामुहिक नेतृत्वाचा मार्ग काढुन 1 जाने 1957 रोजी आपले पहिले अध्यक्षीय मंडळ स्थापन केले 1957च्या सार्वत्रिक निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्याच नावाने लढण्याचा आग्रह होता.परंतु त्यावेळी मुंबईसह महाराष्ट्र यासाठी काँग्रेस खेरीज जनसंघासहीत सर्व आघाडीत होते.ही आघाडीही तत्कालीन शे.का.फे.चाच एक भाग होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाने व रिपाइ नविन पक्ष असल्याने नानासाहेब गोरे,प्र.के.अत्रे यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्त्व नसल्याने आणि ज्या काळात शे.का.फे. होता त्या काळात रिपाइ कळायला उशीर झाल्यामुळे तसेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हे लक्ष पूर्ण होणार नसल्याचे घटक पक्षाने कर्मविर दादासाहेब गायकवाडांकडे आग्रह धरला. शेवटी निर्णया अंती या समितीतील घटक पक्षांनी आपल्या पुर्वीच्याच शेकाफेच्या नावाने निवडणुका लढवाव्या असा निर्णय जाहिर केला.कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी शे.का.फे.च्या माध्यमातुन एकास एक उमेदवार राहिल अशी संयुक्त महाराष्ट्र कृती समितीने काळजी घ्यावी असे ठरवुन महाराष्ट्र कृतीसमितीशी आघाडी करून निवडणुकीस सामोरे गेले.त्या निवडणुकीत कृतीसमितीला घवघवीत यश मिळाले. कृती समिती महाराष्ट्रात सत्तेत आली नाही परंतु प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन उदयास आली असल्याने केंद्र सरकारला 1 मे 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यास भाग पाडले.1957च्या निवडणुकीत शे.का.फे.च्या नावाने 1)कर्मविर दादासाहेब गायकवाड - नाशिक लोकसभा मतदार संघ,2)अॅड.बी.सी.कांबळे - नगर,3)जी.के.माने - मुंबई, 4)हरिहर सोनुले - नांदेड,5) ह.भा.साळुंखे (33वर्षाचे सर्वात लहान)- भोर तालुका,6)दिघे -कोल्हापुर बहुजन समाज, 7)परमार - अहमदाबाद, 8) दत्ता कट्टी - कर्नाटक,चिकोडी मतदार संघ, 9)एन शिवराज - चेन्नई असे 9 खासदार आणि महाराराष्ट्रातुन बहुतांशी आमदार निवडुन आले आणि शेकाफे हा पक्ष देशात 1957 साली दोन नंबरचा पक्ष म्हणुन राहिला.त्यावेळेस गट नेते कर्मविर दादासाहेब गायकवाड होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपाइ लवकरात लवकर कार्यरत व्हावी अशी खंत डॉ.बाबासाहेबांच्या समकालीन नेत्यांच्या मनात होती. पावसाळयामुळे ही प्रक्रिया थांबली अन् 2ऑक्टोंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रिय अधिवेशन नागपुर येथे बॅ.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आले. 3/10/1957च्या रिपाइ च्याराष्ट्रियअध्यक्षपदासाठी कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी महाराष्ट्र व्यतिरिक्त दुस-या प्रांतात हा पक्ष जावा म्हणुन एन.शिवराज यांचे नाव घोषीत केल्याने ते एकमताने निवडुन आले.14 मे 1959 रोजी बी.सी.कांबळे रिपाइतुन बाहेर पडुन त्यांनी दुरूस्त रिपब्लिकन पक्ष स्थापन केला.अन रिपाइच्या बेकीचे बीज तेथेच रूजले गेले.परंतु महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता बी.सी.कांबळे (बापुसाहेब कांबळे)संपूर्ण महाराष्ट्रात कोठेच चालले नाही.1960 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला निर्वाचन आयोगाकडुन मान्यता मिळाली.ऑक्टोंबर 1962ला पुन्हा रिपाइचे दुसरे ऐक्य झाले.या ऐक्यातुन एन.शिवराज,कर्मविर दादासाहेब गायकवाड,राजाभाऊ खोब्रागडे,बि.पी.मौर्य,भय्यासाहेब आंबेडकर, शांताबाई दाणी,इ. समकालीन नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाचा झंझावात देशात सुरू केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राश्ट्रिय अधिवेशने काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत झाली.30 सप्टेंबर 1964ला एन शिवराज यांचे दिल्ली येथील मोर्च्याच्या वेळी दादासाहेब गायकवाडांच्या निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले.तदनंतर ऑक्टो 1964 मध्ये कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी रिपाइचे बॅरीस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे राष्ट्रिय अध्यक्ष व्हावेत अशा आषयाची सुचना मांडली परंतु समकालीन नेत्यांनी ही सुचना अमान्य करून कर्मविर दादासाहेब गायकवाडांचीच रिपाइचे राष्ट्रियअध्यक्ष म्हणुन निवड केली. कर्मविर दादासाहेब गायकवाडांनी 6 डिसेंबर 1964ला 14 कलमी डिमांड घेऊन भूमीहिन सत्याग्रह करण्याची घोषणा केली त्यात एक घोष वाक्य होते.‘‘कसेल त्याची जमिन,नसेल त्याचे काय ? राहिल त्याचे घर,नसेल त्याचे काय ?’’हा सत्याग्रह जवळपास दोन महिने चालला.देशभरात सुमारे 3 लाख 65 हजारांच्यावर लोक तुरूंगात गेले. तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी फेब्रुवारी महिन्यात शिष्टमंडळास पाचारण केले. त्या शिष्टमंडळात कर्मविर दादासाहेब गायकवाड,बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे,दत्ता कट्टी,अषोक निळे,रा.सु.गवई,अनसुमंतराव गायकवाड आदी नेते होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक अन् भुमीहिनांचा, झोपडपट्टयांचा प्रश्न आदी प्रश्न सोडवले जाऊन दिनांक 5 फेब्रुवारी 1965ला हा सत्याग्रह यशस्वी झाला.

1962 साली उत्तर प्रदेश मधुन रिपाइचे 3 खासदार निवडुन आले होते.पंजाब मध्ये अकाली दल आणि आरपीआयची पहिली सत्ता स्थापन झाली त्यामध्ये दोन मंत्री हे आरपीआयचे होते.1965 साली आरपीआय सत्तेत होती याचे कारण बी.पी.मौर्य,संघप्रिय गौतम आणि कादरखान हे तिन नेते बाबासाहेबांच्या विचाराच्या दिशेने प्रामाणिक काम करीत होते.या काळात उत्तरप्रदेशात आरपीआय आणि एस.व्हि.डी. यांचे सरकार होते.चैधरी चरणसिंग तेव्हा मुख्यंत्री झाले.त्या सरकार मध्येही आरपीआयचे तिन मंत्री होते. 1967 साली रिपब्लिकन पक्षाला चांगले मतदान मिळाले.काही राज्यात रिपब्लिकन पक्षाला मंत्रीमंडळात मिळालेले स्थान हे केवळ रिपब्लिकन पक्षाच्या मतसंख्येच्या आधारे मिळाले होते.मागणी न करता मंत्रीमंडळात रिपब्लिकन पक्षाच्या आमदारांना घेतले जात होते.इतका दबदबा या पक्षाचा होता.पंजाब राज्यात धानुलिया यांना कॅबिनेटमंत्री म्हणुन घेण्यात आले.उत्तरप्रदेश मध्ये एक कॅबिनेट मंत्री घेण्याऐवजी असरार अहमद आणि शमीम आलम या दोन आमदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आले.हा पक्ष केवळ बौद्धांपुरता मर्यादीत नव्हता तर या पक्षाचे मंत्री मुस्लिमही होते. बिहारमध्ये रिपब्लिकन पक्षाची एवढी ताकद होती की,तेथे लाल पासवान नावाचा एकच उमेदवार निवडुन आला असला तरी त्याला मंत्रीमंडळात स्थान देण्याशिवाय गत्यंतर नव्हते.महाराष्ट्राशिवाय उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार,हरियाना या उत्तर भारतीय राज्यात रिपब्लिकन पक्ष हा एक समर्थ पक्ष होता. .   ऑक्टो.1968ला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे रिपाइतुन बाहेर पडले अन् स्वतंत्र खोब्रागडे गटाची निर्मिती केली.कर्मविर दादासाहेब गायकवाडांना अर्धांगवायुचा झटका आल्याने 29 डिसेंबर 1971ला कर्मविर दादासाहेब गायकवाड यांचे निर्वाण झाले.1972 मध्ये कोल्हापुरातील बावडा गावात गवई बंधुंचे डोळे काढण्यात आले.त्यावेळेस डॉ.बाबासाहेबांची विचारधारा अन् नांव ऐकुन असलेले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपले उद्धारकर्ते असल्याचे समजत असतानाही युक्रांत समाजवाद्यांच्या (कम्युनिस्ट)चळवळीत प्रॅक्टिकल रितीने काम करणा-यांनीच अन्याय अत्याचाराचे निमित्त साधुन कळत नकळत रिपाइला नेस्तनाबुत करण्यासाठी सर्वांच्या मदतीने दलितपॅंथर्सची निर्मिती केली.26 जाने 1974ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तिसरे ऐक्य झाले.सी.आर.मोघम, बॅ.राजाभाऊ खोब्रागडे, भय्यासाहेब आंबेडकर, रा.सु.गवई, बी.सी.कांबळे,शांताबाई दाणी हे ऐक्यात सामील झाले. पहिले 35 लोकांचे ऐक्याचे प्रेसीडियम झाले.मुंबईत पहाटे चार वाजेपर्यंत वसाहतीत मिटींग चालु झाल्या.पहिल्या प्रेसीडियमची बैठक सी.आर.मोघम यांनी बंगलोर येथे बोलवली तर दुसरी अमरावतीत झाली दुस-या बैठकीतुन बॅ.राजाभाऊ खोब्रागडे अन् त्यांचे सहकारी भय्यासाहेब आंबेडकर,घनश्याम तळवटकर,सुमंतराव गायकवाड,दत्ता कट्टी हे बाहेर पडले.तदनंतर बापुसाहेब कांबळे हे देखील बाहेर पडल्याने सी.आर.मोघम,रा.सु.गवई,वा.को.गाणार,सदानंद फुलझेले,आर.जी.खरात,शांताबाई दाणी,अॅड.बाजीराव कांबळे ऐवढेच रिपाइत शेष राहिले. वर्ष सहा महिन्याच्या आतच ही ऐक्य प्रक्रिया संपुष्टात आली.

1975च्या दरम्यान खोब्रागडे गटातुनही भय्यासाहेब आंबेडकर, घनश्याम तळवटकर, सुमंतराव गायकवाड,आर.जी.रूके,प्रा.रमाकांत यादव, हे बाहेर पडले.1976च्या दरम्यान शांताबाई दाणी व त्यांचे सहकारी भाऊसाहेब चव्हाण,दादासाहेब रोहम,हे रिपाइ तुन बाहेर पडले.अशा त-हेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची वाताहत झाली. दुर्देवाने 17/9/1977ला मुंबईच्या के.ई.एम.रूग्णालयात भय्यासाहेब आंबेडकरांची प्राणज्योत मालवली.1976 ते 1978 पर्यंत रिपाइचे गटातटाचे राजकारण चालुच होते.1978च्या हिवाळयात दादासाहेब रोहम,रा.सु.गवई समवेत एन.एस.कुभारे,व सी.आर.मोघम हे दिल्ली येथे आमरण उपोषणास बसले.1978च्या सरते शेवटी भारतीय दलित पॅंथर्सने रिपब्लिकन पक्षाच्या पुढा-यांस लक्ष अन् भक्ष ठरविले.भारतीय दलित पॅंथर्सचा गवगवा झाल्याने त्यांनी सवर्ण बहुजनांचा अर्वाचीत शिवराळ भाषेत उद्धार केला.आणि नामांतराचा लढा हाती घेतला.त्यांच्या बरोबरीने नागपुर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रिंसिपल पद न मिळाल्याने प्रा.जोगेंद्र कवाडे सरांनी लॉंग मार्च दलित मुक्ति सेना स्थापन केली.त्यांच्यातल्याच त्यांच्या अहमहमिकेतुन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पावसाळी अधिवेशनात नांमातराची घोषणा केली. निमित्त नामांतराचे होते परंतु सवर्ण बहुजनांना राग होता तो त्यांच्या शिवराळ भाषेचा अन् त्यामुळेच मराठवाडा दंगल पेटली. दंगलीत सबंध मराठवाडा पेटला त्यात 649 पेक्षाही जास्त मृतांचा शासनाचा आकडा होता.सबंध मराठवाडयात मातंग,बौद्ध समाजाच्या वसाहती जळाल्या.त्यात पोचीराम कांबळे सारख्या मातंग समाजाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरी अनुयायाच्या शरिराचे छिन्नविछिन्न तुकडे करण्यात आले तरीही शेवटच्या श्वासाच्या क्षणापर्यंत ‘जयभिम’चा नारा त्यांनी सोडला नाही.

                          अष्याही परिस्थितीत भारतीय दलित पॅंथर्सला भावनिक चळवळ वाढवायचीच होती. मात्र छत्रपती शाहु महाराज,महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सिद्धांता नुसार रिपाइतील रा.सु.गवई,दादासाहेब रोहम यांनी सामाजिक भान ठेवुन आपले बौद्धिक कौशल्य पणाला लावुन सहा महिन्याच्या आतच मराठवाडयात जातीय सलोखा निर्माण करून पुर्ववत मराठवाडयातील दलित वस्त्या शासनाच्या मदतीने पुर्ववत केल्या.वसाहती वसवुन समझोताही केला.उद्धवस्त झालेले संसारही त्यांनी बसविले.

1983 -84च्या कालखंडात तत्कालीन महाराष्ट्र राज्य सेवेतील सिनिअरमोस्ट सनदी बुद्धिस्ट अधिकारी यांनी आणखी एक गट निर्माण केला.या वादळाला अकोला,पॅटर्न,नांदेड पॅटर्न असे संबोधु लागले.1984ला अकोल्यातुन भारीपचे प्रकाशराव आंबेडकर यांना निवडणुकित अपयश आले.9 सप्टेंबर 1984 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे दीर्घ आजाराने निधन दिल्ली येथे झाले.दिनांक 18/19 जानेवारी 1985 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे ज्येष्ट सहकारी दत्ता कट्टी अन् त्यांचे सहकारी व रा.सु.गवई यांचे सहकारी म्हणजेच वा.को.गाणार,सदानंद फुलझेले,पी.टी.मधाळे - माजी आमदार सांगली,खंडेराव सावंत -माजी आमदार सातारा,दादासाहेब रोहम -माजी आमदार संगमनेर नगर,दादासाहेबब शिर्के -कोल्हापुर, तसेच शांताबाई दाणी,अॅड. बाजीराव कांबळे -कर्जत सातारा,भाऊसाहेब चव्हाण,एम.डी.शेवाळे,के.बी.श्रृंगारे -नाशिक,देवीदास वाघपांजार -दर्यापुर अमरावती, नानासाहेब उर्फ गंगाराम इंदिसे,व्हि.बी.ससाणे - ठाणे,आदींचे 18/19 जानेवारीत नागपुरच्या आमदार निवासात ऐक्या संदर्भात म्हणजेच गवई व खोब्रागडे गटात बैठक झाली.त्या ऐक्यातुन दत्ताजी कट्टी अध्यक्ष अन् रा.सु.गवई कार्याध्यक्ष झाले. आणि 1985च्या मार्च महिन्यातील सार्वत्रिक विधान सभेच्या निवडणुकीस सामोरे जावे लागले. सहा महिन्यातच दत्ता कट्टी गेले अन् ऐक्य फुटले.सहा महिन्याच्या आतच या ऐक्यप्रक्रियेची फाटाफुट झाली परंतु देशातील बहुतांषी बॅरिस्टर राजाभाऊंना माननारा वर्ग हा दादासाहेब रोहम व रा.सु.गवई यांच्या बरोबरच राहिला.त्या ऐक्यप्रक्रियेतुन दत्ता कट्टी हे एकटे बाहेर फेकले गेले.घनश्याम तळवटकर,सुमंतराव गायकवाड,आर.जी.रूके, प्रा.रमाकांत यादव हे दादासाहेब रोहम,रा.सु.गवई यांच्या सोबत राहिले. तदनंतर पुन्हा एकदा1995 साली रिपाइचे पाचवे ऐक्य झाले अन् चार खासदार संसदेत निवडुन आले.तेही ऐक्य लवकरच फूटले. 1988ला ऐन पावसाळयात रिडल्स प्रकरण घडले.6 डिसेंबर 1988ला रा.सु.गवईंनी दिल्ली येथील बोटक्लब वर लाक्षणीक अशा भव्य मोर्च्याचे आयोजन केले असता ‘न भूतो न भविष्यती अशामोर्च्यात सुमारे 6 ते 7 लक्ष अनुयायांनी सहभाग घेतला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष कर्मविर दादासाहेब गायकवाड ते एन.शिवराज यांच्या नंतर गल्ली ते घराघरा पर्यंत वाटला गेला.जो,तो उठतो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव अन् निळे निशाण घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुढे अबकड लावुन संघटना तयार करून पुढारपणाच्या नावाखाली आपल पुढारपण आणि आपल्या घराची व्यवस्था कशी होईल या प्रवृत्तीने वागायला लागले आहेत. त्यामुळे दिवसेगणिक आंबेडकरी जनतेवर, मायभगिनींनीवर, मागासवस्त्यांवर, अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत.अन्याय,अत्याचार झाल्यानंतर पुढारी अश्रु पुसावयास जातात परंतु त्यांचे मुळ शोधत नाहीत.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पने प्रमाणे ‘‘माझा समाज सत्तास्थानी व सत्ताधारी असला पाहिजे’’ या उलट आज पुढा-यांची दशा झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या संकल्पनेचा विसर पडुन ते आज शिवसेना,बि.जे.पी.चे स्वप्न साकार करावयास निघालेत या सारखी दुर्देवाची बाब कोणती ? मग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत अन् संकल्पना हे प्रात्यक्षिक वास्तव्यात आणावयाचे असेल तर आमच्या कार्यकर्त्यांनी‘‘नेता छोडो समाज जोडो !’’हे अभियान सुरू केले आहे.समाज जागृत आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरी विचारांशी एकनिष्ठ आहे.समाजात एकसंघ खंबीर नेतृत्व नसल्याने समाज दिषाहिन झालेला आहे.‘‘ नेत्यांचे ऐक्य करण्या ऐवजी समाजाचे ऐक्य व्हावे ’’ हाच खरा उद्येश असल्याने या पक्ष स्थापने मागची नानासाहेब इंदिसे यांनी आपली भुमीका स्पष्ट करताना रिपब्लिकन पक्ष एक व्हावा.हीच भुमिका पक्ष स्थापनेमागची होती आणि आजही त्या भुमिकेवर मी ठाम आहे.मला अध्यक्षपदाचा हव्यास मुळीच नाही.म्हणुनच मी कुमारसेन बौद्ध (दिल्ली) यांना अध्यक्ष केले होते.परंतु दुर्देवाने ते या कामी सपशेल अपयशी ठरले.ऐक्यासाठी मी आर.पी.आय.नेते रामदासजी आठवले,प्रा.जोगेंद्र कवाडे सर,बाळासाहेब आंबेडकर,व इतरही लहाणमोठया गटनेत्यीशी बोललो चर्चा केल्या परंतु त्यातुन ऐक्य काही घडुन आले नाही.मी आठवले व कवाडे सरांना दिल्ली येथील बैठकीत सांगीतले निदान तिघे तरी आपण प्रथम एकत्रित येऊ परंतु तांत्रिक कारणे पुढे करून या नेत्यांनी या ऐक्याला फाटा दिला.मी नामवंत आंबेडकरी कलावंत यांच्या माध्यमातुन नागपुर,पुणे,भिमा कोरेगांव, महाड,मुंबई,ठाणे,औरंगाबाद,दिल्ली,अहमदाबाद,सुरत,बडोदा इत्यादी शहरांमध्ये मेळावे आयोजीत करून जनतेला हाक दिली.जनतेलाही ऐक्य हवे आहेपरंतु जनतेत नेत्यांचीच विश्वासार्हता कमी झालेली आहे.कारण अनेक वेळा ऐक्यफुटणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले उद्यिष्ट साध्य करता आले नाही.याची खंत माझ्या सहित देशातील तमाम आंबेडकरी समाजाला आहे.आम्ही एकत्रित आलो तर बहुजन समाजही आमचे बरोबर एकत्रित येईल.तसा विश्वास त्यांच्यात निर्माण करता येईल.मी आशावादी आहे आणि निश्चयी सुद्धा आहे.म्हणुन मला आशा आहे की एक दिवस इतर पक्षाच्या चाक-या सोडुन नेते नक्कीच एकत्र येतील.तेव्हाएका डोळयात बुद्धांची शांती तर दुस-या डोळयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भिमक्रांती तेवत ठेवा.तसेच बुद्धधम्माचे अन् बावीस प्रतिज्ञांचे पालन करून बुद्धविहारात एकत्रित बसुन लोकशाही प्रमाणे आम्हास या देशाची शासनकर्ती जमात बनावयास पाहीजे असा आपण सम्यक संकल्प केला पाहिजे. आपण सर्व मैत्रीबंधुभावनेने एकदिलाने,एकविचाराने प्रज्ञारूपी सूर्याचे सूर्यकिरणे बनुन या महामानवाने बदललेल्या इतिहासाला साक्षी ठेवुन या भारत देशात परिवर्तन घडवुन आणु अन् आपल्या हाताच्या ओंजळीनेच पाणी पिऊ.आपण आपल्याच ऐक्याच्या कर्तुत्वाने उजाळु अन् शासनकर्ती जमात बनु तेव्हाच ख-या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची,राज्यघटनेची आणि भारत देषाची महती जगाला कळेल.हाच खरा कोटी-कोटी प्रणाम महापुरूष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांस आपल्या सर्वांच्यांच निश्चयातुन लाभेल. . - नानासाहेब इंदिसे राष्ट्रिय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी

                                  !!! जयभिम !!!