Jump to content

रा.वि. मराठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामचंद्र विनायक मराठे तथा रा‌‌.वि.मराठे (जन्म - ५ एप्रिल १८८२) हे कोशकार होते. त्यांनी 'स्थापत्य-शिल्प' तसेच 'पुरातत्त्वशास्त्र' या विषयांवरील इंग्रजी-मराठी शब्दांचे संकलन करून कोशनिर्मिती केली.

शिक्षण व नोकरी

[संपादन]

पुणे येथील इंजिनिअरींग कॉलेज मधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका (डी.सी.इ.) संपादीत केल्यावर ते शासकीय नोकरीत रुजू झाले. गुजरात व महाराष्ट्रात विविध पदांवर ३४ वर्षे नोकरी केल्यावर ते १९४७ साली निवृत्त झाले.

कोश संपादन

[संपादन]

१९२८ पासून नोकरीवर असताना छंद म्हणून गोळा केलेल्या शब्दसंग्रहाचे निवृत्तीनंतर संकलन करून त्यांनी पुस्तकात रुपांतर केले. महाराष्ट्र राज्य साहित्य व‌ संस्कृती मंडळाने हा कोश इंग्रजी-मराठी स्थापत्य-शिल्प-कोश (सचित्र) या नावाने इंग्रजीत प्रसिद्ध केला. पुढे पुरातत्त्वशास्त्र या विषयावरील शब्दांचे संकलन करून १९८३ साली त्यांनी इंग्रजी-मराठी पुरातत्त्व कोश (सचित्र) हा आणखी एक लहान कोश‌ प्रसिद्ध झाला.

पुस्तके

[संपादन]
  • इंग्रजी-मराठी स्थापत्य-शिल्प-कोश (सचित्र), महाराष्ट्र राज्य साहित्य व‌ संस्कृती मंडळ, १९६५, पृ.२९०
  • इंग्रजी-मराठी पुरातत्त्व कोश (सचित्र), मंजिरी श्री मराठे, १९८३, पृ.१३०

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]