Jump to content

राष्ट्राध्यक्ष (अमेरिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे चिन्ह
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

राष्ट्राध्यक्ष हा अमेरिकेतील सरकारप्रमुख व राजकीयदृष्ट्या सर्वोच्च पातळीवरचा पुढारी आहे. राष्ट्राध्यक्ष हा अमेरिकेचा लष्करप्रमुख देखील असतो. उपराष्ट्राध्यक्ष, मंत्रीमंडळाचे सचिव, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, परराष्ट्रराजदूत इत्यादी अनेक महत्त्वाच्या पदांची नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्राध्यक्षाला आहेत.

दर ४ वर्षांनी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूकीत सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडला जातो. एका पुढाऱ्याला कमाल ८ वर्षे राष्ट्राध्यक्षपद भुषविता येते.

जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचा पहिले राष्ट्राध्यक्ष होते. बराक ओबामा हे अमेरिकेचा ४४ वे राष्ट्राध्यक्ष आहेत.