राशिन
Appearance
रेशन याच्याशी गल्लत करू नका.
राशिन हे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील एक शहर आहे. येथे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जगदंबा देवीचे प्राचीन मंदिर आहे व येथील नवरात्र उत्सव व दसरा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. हे शहर सोलापुर , पुणे , अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे त्यामुळे येथील बाजारपेठ ही सर्वात मोठी म्हणून ओळखली जाते. .