Jump to content

राम मंदिर (कागल)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राम मंदिर, कागल या पानावरून पुनर्निर्देशित)

राम मंदिर कागल हे एक कागल मधील मंदिर आहे[]

स्थापना

[संपादन]

२००७ मध्ये याचे भूमीपूजनाने करून जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात झाली होती.आग्रा येथील ताजमहालसाठी वापरलेल्या राजस्थानातील मकराना येथील शुभ्र संगमरवरातून कागलमधील श्रीराम मंदिरात जीर्णोद्धार केला आहे. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आणि लोकसहभागातून स्थापत्यशास्त्रातील आगळे मंदिर साकारले आहे. गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेले काम पूर्णत्वास येत असून, कागल येथील मध्यवर्ती खर्डेकर चौकातील श्रीराम मंदिराची जुनी इमारत जीर्ण झाल्याने दहा वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धाराची संकल्पना स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी मांडली. आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह कागलच्या नागरिकांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. अहमदाबादच्या प्रसिद्ध अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवर कागलमधील श्रीराम मंदिर बांधण्याचे ठरल्यामुळे तेथील वास्तूविशारद देवदत्त त्रिवेदी यांच्याकडून मंदिराचे डिझाइन तयार करून घेण्यात आले. कागलमधील वास्तूविशारद अमर चौगुले यांच्या देखरेखीखाली हे काम आले.मंदिरासाठी सहा कोटी रुपयांचा खर्च आला असून यातील २ कोटी ३२ लाख रुपये आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने सरकारकडून मिळाले. ३ कोटी २० लाख रुपयांचा निधी छत्रपती शाहू कारखान्याचे सभासद, कर्मचारी, कंत्राटदार आणि इतर देणगीदारांनी दिला. कागलच्या नागरिकांनीही मंदिरासाठी मोठा हातभार लावला. १२ गुंठे जागेतील मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी वापरलेले संगमरवर राजस्थानमधील मकराना येथून मागवले आहे. तळमजल्यावर चार हजार स्क्वेअर फुटांचे ध्यानमंदिर व प्रवचन हॉल आहे. राम मंदिर हे आता कागल मधील एक महत्त्वाचे पर्यटनाचे स्थान बनले आहे. दरवर्षी या मंदिरास भेट देणाऱ्या लोकांची संख्या ही प्रचंड आहे.

  1. ^ "कागलला साकारले श्रीराम मंदिर". Maharashtra Times. 2020-01-09 रोजी पाहिले.[permanent dead link]