Jump to content

रामनाथ गोएंका पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रामनाथ गोयंका पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१७


रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (RNG पुरस्कार) हे भारतातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील पुरस्कारांपैकी एक आहेत. रामनाथ गोएंका यांच्या नावावर असलेले हे पुरस्कार २००६ पासून दरवर्षी आयोजित केले जात आहेत. २०२१ मध्ये याची १४ वी आवृत्ती आयोजित केली गेली.[] हे पुरस्कार मुद्रित पत्रकारिता तसेच प्रसारण पत्रकारिता या दोन्हींसाठी दिले जातात. २०२१ मध्ये उत्कृष्टतेसाठी एकूण १६ वर्गवारींसाठी हे पुरस्कार देण्यात आले.[][]

भूतकाळातील विजेत्यांमध्ये कुलदीप नायर (जीवनगौरव पुरस्कार), सिद्धार्थ वरदराजन (द हिंदू), शशी थरूर, डिओने बुंशा, मुझमिल जलील (द इंडियन एक्सप्रेस), राजदीप सरदेसाई, करण थापर (सीएनएन आयबीएन), किशलय भट्टाचार्जी, रवीश कुमार (एनडीटीव्ही), उमाशंकर सिंग (एनडीटीव्ही), निधी राझदान (एनडीटीव्ही), नीलेश मिश्रा (हिंदुस्तान टाइम्स), क्रिस्टोफ जाफ्रेलॉट (द कॅरव्हॅन), मार्क टुली (बीबीसी), अर्णब गोस्वामी (टाइम्स नाऊ) आणि सुधीर चौधरी (झी न्यूझ) आणि इतरांचा समावेश आहे.[][][]

रामनाथ गोएंका (१९४२ मधील छायाचित्र)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कारांचे सोमवारी वितरण". लोकसत्ता. 2022-01-28 रोजी पाहिले.
  2. ^ "Ravish Kumar, Shashi Tharoor and 25 others win Ramnath Goenka Excellence in Journalism Award - Exchange4media". Indian Advertising Media & Marketing News – exchange4media (इंग्रजी भाषेत). 2022-01-28 रोजी पाहिले.
  3. ^ "Ramnath Goenka Awards for Excellence in Journalism". Jagran Josh (इंग्रजी भाषेत). 2010-10-09. 2022-01-28 रोजी पाहिले.
  4. ^ "Ramnath Goenka Excellence in Journalism awards: Full list of winners". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2022-01-05. 2022-01-28 रोजी पाहिले.
  5. ^ "Goenka awards for 29 journalists" (इंग्रजी भाषेत). 2009-04-15. ISSN 0971-751X.