रामदास पठार
Appearance
रामदास पठार हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात असलेल्या महाड तालुक्यातील एक गाव आहे. महाडपासून साधारण ३५ ते ४० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. वरंधा घाटाच्या माथ्यावर हे गाव वसले आहे. या गावामध्ये समर्थ रामदास स्वामी यांचे भव्यदिव्य मंदिर आहे. या गावामध्ये समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य होते. तसेच रामदास पठार या गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर नवीन संशोधित शिवथर घळ सापडली आहे.