रामचंद्र वीरप्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रामचंद्र वीरप्पा (इ.स. १९०८-जुलै १८, इ.स. २००४) हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९६२ आणि इ.स. १९६७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून कर्नाटक राज्यातील बीदर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.