रफीक जुमादीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राफीक जुमादीन या पानावरून पुनर्निर्देशित)

रफीक रसिफ जुमादीन (१२ एप्रिल, १९४८:त्रिनिदाद - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९७२ ते १९७९ दरम्यान १२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करायचा.