राज्यकारभाराच्या शाखा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राजकारणशास्त्रात राज्यकारभाराच्या तीन प्रमुख शाखा मानण्यात येतात.

  • विधीमंडळ शाखा
  • कार्यकारण शाखा
  • न्यायसंस्थाजक

विधीमंडळ शाखा[संपादन]

विधीमंडळ शाखेचे काम कायदे तयार करणे व कायद्यांमध्ये सुधारणा करणे हे असते. उदाहरणार्थ, भारतीय राज्यघटनेप्रमाणे, संसद ही संस्था विधीमंडळ शाखेचे काम करते.

कार्यकारण शाखा[संपादन]

राज्याच्या दैनंदिन कारभाराची कामे करणे ही कार्यकारण शाखेची जबाबदारी आहे. उदाहरणार्थ, संसदीय लोकशाहीमध्ये, बहुमताने निवडून आलेले पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे कार्यकारी शाखेची जबाबदारी पार पाडतात, तर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये कार्यकारी शाखेची जबाबदारी राज्याचे अध्यक्ष व त्यांनी नेमलेले सहायक अधिकारी यांच्याकडे असते. कार्यकारी शाखेचा प्रमुख हा राज्याचा प्रमुख असतो. ज्या राज्यसंस्थामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण हा हेतू असतो, त्यात कार्यकारी शाखेची जबाबदारी कायदे करणे ही नसून, कायद्यांची अंमलबजावणी करणे ही आहे.

न्यायसंस्था[संपादन]

राज्याच्या न्यायव्यवस्थेचे प्रशासन करणे, व विधीमंडळ शाखेने केलेल्या कायद्यांचे अर्थ स्पष्ट करणे हे न्यायसंस्थेचे काम आहे.