राजावर्त
राजावर्त (Lapis lazuli) हा एक सुंदर निळ्या रंगाचा दगड असून पूर्वीच्या काळी टिकाऊ निळा रंग असा हा एकच उपलब्ध असल्यामुळे प्राचीन काळापासून उंची आभूषणांमध्ये, चित्रांमध्ये आणि वस्त्रांना रंग देण्यासाठी वापरला जात आला आहे. [अजिंठा] येथील सुप्रसिद्ध भित्तिचित्रांमध्ये वापरलेला निळा आणि हिरवा रंग या राजावर्ताच्या कुटापासून बनवलेला आहे असे समजते. हा दगड प्राचीन अफगाणिस्तानमध्ये मिळत असे. बडाखशान हा अफगाणिस्तानाचा उत्तरेकडील प्रांत या दगडांच्या खाणींसाठी प्रसिद्ध होता.
हा दगड काढण्यासाठी ज्या खाणी असत त्या खोल दऱ्यांमध्ये असल्याने केवळ उन्हाळ्यातील बर्फ वितळल्यानंतर ते नवीन बर्फ पडण्यापूर्वी, अशा तीन महिन्यांत हा दगड काढावा लागे. याखेरीज हा खडा दागिन्यात वापरण्यासाठी तो मूळ दगडाच्या लादीपासून आणि इतर खनिजद्रव्यांपासून वेगळा करण्यासाठी श्रम घ्यावे लागत, असे काम जेथे होत असे अशांपैकी शहर-ए- सोख्ता हे अफगाणिस्तान आणि इराण यांच्या सीमेवरील एक शहर प्रसिद्ध आहे. पाकिस्तानातील मेहरगढ, जालिपूर आणि रेहमान डेहरी येथे राजावर्ताचे घडवलेले मणी, तसेच दागिन्यात न वापरता येण्याजोगे दगडही सापडले आहेत.
संदर्भ
[संपादन]- भारतीय पुरातत्त्वखाते - अजिंठा-वेरूळची लेणी
- दी अफगाण कनेक्शन (भाषा: इंग्रजी) लेखक: पी. व्ही. पाठक, प्रज्ञा प्रकाशन, रायगड, १९९९)
- एन्शन्ट मेसोपोटेमियन मटीरियल्स अँड इंडस्ट्रीज, पीटर रॉजर स्टुअर्ट मुरी (भाषा: इंग्रजी)
- पुनश्च - हिंदी निबंध (लेखक: हजारीप्रसाद द्विवेदी - किताबघर प्रकाशन १९९२)
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |