Jump to content

राजगुरुनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राजगुरूनगर या पानावरून पुनर्निर्देशित)
राजगुरूनगर नगरपरिषद
जिल्हा पुणे जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या १७६३६
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२१३५
टपाल संकेतांक ४१०५०५
वाहन संकेतांक एम्.एच्.-१४
निर्वाचित प्रमुख सौ कहाणे
(सरपंच)

राजगुरुनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याच्या खेड नावाच्या तालुक्याचे मुख्यालय आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे 'खेड’ हे नाव बदलून ते राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी, तालुक्याचे नाव अजूनही खेड हेच आहे. हे गाव भीमा नदीकाठी आहे. खेड हे हुतात्मा राजगुरू यांचे जन्म गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

पुणे-नाशिक रोडवर

हवामान

[संपादन]

येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २,२६० मिमी असते.

लोकजीवन

[संपादन]

शैक्षणिक सुविधा

[संपादन]

खेड तालुक्यातील व परिसरातील सर्वसामान्य, डोंगरी, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी, या उदात्त हेतूने खेड तालुक्याचे माजी आमदार स्व. साहेबरावजी बुट्टेपाटील यांनी १९७४ साली 'खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची' स्थापना केली. 'प्रज्वालितो ज्ञानमय: प्रदिप:' या बोधवाक्याचा स्वीकार करून तालुक्यातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून त्यांचे जीवन घडविण्याचे मूलभूत कार्य करणाऱ्या या संस्थेने राजगुरुनगर येथे थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या नावाने 'हुतात्मा राजगुरू महाविद्यालय' १९७७ साली सुरू केले.

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

बारा ज्योतिर्लिंग पैकी भीमाशंकर येथे पुरातन भव्य शिव मंदिर, भीमाशंकर राष्ट्रीय अभयारण्य येथे आहे, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा,धनंजय चंद्रचूड पिता पुत्र हे दोन्ही मा,न्यायाधीश मान्यवर याच तालुक्यातील कनेरसर या गावचे मूळ रहिवासी आहेत,बडोद्याचे श्रीमंत राजेशाही गायकवाड घराणे याच तालुक्यातील दावडी गावचे वंशज

पावसाळ्यात मंदोशी येथील नयन मनोहर धबधबे पहावयास मिळतात.शिवाय चास कमान धरण परिसर इत्यादी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.नवव्या शतकातील भोरगिरी येथील कोटेश्वर मंदिर परिसर व पांडव कालीन लेणी भोरगड,भीमाशंकर येथील नागफणी इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत.

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

वाफगाव, खरपुडी बु ,चास,शिरोली,चंडोली, दोंदे,वडगाव पाटोळे,

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

खेड मधे प्रसिद्ध "शंकराचे सिद्धेश्वर मंदीर" आहे