Jump to content

रस्टी चीक्ड स्किमिटर बॅबलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रस्टी चीक्ड स्किमिटर बॅबलर

रस्टी चीक्ड स्किमिटर बॅबलर (rusty-cheeked scimitar babbler - Pomatorhinus erythrogenys) (ताम्रवर्णी तलवारचंचू रानभाई) ही एक रानभाई पक्ष्याची प्रजात आहे. ही सर्वसाधारणपणे हिमालयाच्या पायथ्याशी आणि आग्नेय आशियात आढळतो.

वर्णन

[संपादन]

हिरवट तपकिरी रंगाच्या या पक्ष्याच्या मान आणि चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंचा भाग, डोके आणि पायांच्या वरचा भाग ताम्रवर्णी असतो. त्याची चोच तलवारीच्या आकाराची असल्यामुळे त्याला मराठीमध्ये तलवारचंचू म्हणले जाते. डोळ्यांभोवतालचा भाग फिकट राखी असतो. गळा आणि छातीचा भाग सहसा पांढऱ्या रंगाच्या पिसांनी भरलेला असतो. या जातीतल्या पक्ष्यांमध्ये नर आणि मादी यांच्या रंग-रूपात काहीच फरक नसतो. भारतात हिमालयाच्या पायथ्याशी आणि आग्नेय आशियामधील डोंगर उतारांवरील जंगलांमध्ये थव्यामध्ये तो आढळतो. आपल्या चोचीच्या साह्याने ते जमिनीवर पडलेली पाने उचलून त्याखाली दडून बसलेल्या कीटकांचा शोध घेतात. काही वेळा ते झाडांच्या फांद्यांवरही आढळतात. मात्र सहसा ते जमिनीवरच आपल्या खाद्याचा शोध घेत असतात. या पक्ष्यांची पिले फिकट ताम्रवर्णी असतात.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ A pictorial field guide to Birds of India, Pakistan, Nepal, Bhutan, Sri Lanka and Bangladesh, Bikram Grewal et al., Om book International. PP 471