Jump to content

रवी बासवानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रवी बासवानी आपल्या विनोदी भूमिकांसाठी भारतात लोकप्रिय होते. सई परांजपे यांच्या चश्मेबद्दूर (१९८१) आणि कुंदन शाह यांच्या जाने भी दो यारों (१९८३) मधिल त्यांच्या विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. त्यांच्या विनोदाचे टायमिंग अचूक असे आणि विनोद चेहऱ्याच्या हावभावातून व्यक्त करण्याची कला त्यांना चांगलीच अवगत होती. जाने भी दो यारों मधील त्यांच्या भुमिकेला १९८४चा बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेर पुरस्कार त्यांना मिळाला होता.[१]

सुरुवातीचे दिवस[संपादन]

रवि बासवानी
जन्म रवि बासवानी
२६ सप्टेंबर, १९४६
दिल्ली
मृत्यू २७ जुलै, २०१०
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र हास्य अभिनेता,
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८१ – २००६
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट जाने भी दो यारो, चश्मेबदुर
प्रमुख टीव्ही कार्यक्रम इधर उधर

रवी बासवानी यांचा जन्म दिल्ली येथील एका जाट कुटूंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट जॉर्ज कॉलेज, मसुरी येथून आणि पदवीचे शिक्षण दिल्लीच्या सुप्रसिद्ध किरोडीमल कॉलेजमधुन (KMC) झाले. ते के.एम.सी. ड्रॅमॅटीक सोसायटीचे सदस्य होते.[२]

कारकीर्द[संपादन]

बासवानी यांची कारकीर्द १९८१ च्या चश्मेबद्दूर या यशस्वी विनोदी सिनेम्याने सुरू झाली. त्यांनी त्याअनंतर अनेक हिंदी चित्रपट आणि टीवी सिरीयल्समध्ये काम केले. त्यांनी जाने भी दो यारों, कभी हां कभी नां, छोटा चेतन, अब आयेगा मजा या हिंदी चित्रपटांमधुन काम केले. दिग्दर्शक म्हणून प्रथमच बनविलेल्या नासिरुद्दीन शाह यांच्या यूं होता तो क्या होता या चित्रपटातही काम केले. दुरदर्शनवरील १९८० च्या दशकातील त्यांची इधर उधर ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत त्यांनी सुप्रिया पाठक आणि रत्ना पाठक या अभिनेत्री भगिनींबरोबर काम केले होते. पुढे त्यांनी बंटी और बबली आणि प्यार तुने क्या कीया या चित्रपटांतून चरित्र अभिनेत्याचेही काम केले. २००४ मध्ये जेव्हा पुण्याच्या सुप्रसिद्ध फ़िल्म अ‍ॅंड टेलिविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडीया मध्ये तब्बल २६ वर्षांनी अभ्यासक्रमाचे नूतनीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला, तेव्हा त्यावर मार्गदर्शक म्हणून नासिरुद्दीन शाह आणि रवी बासवानी यांची नियुक्ती करण्यात आली. रवी बासवानी या संस्थेत शिक्षक म्हणूनही नियुक्त झाले पण एका वर्षातच त्यांनी ही नोकरी सोडून दिली.[३]

मृत्यू[संपादन]

२७ जुलै २०१० रोजी रवी बासवानी नैनीतालहून दिल्ली कडे जाताना हल्दवानी गावाजवळ त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आपल्या पहिल्याच दिग्दर्शीत चित्रपटासाठी योग्य स्थळाची पाहणी करण्यासाठी ते नैनीतालला गेले होते. त्यांनी लग्न केले नव्हते.[४]

चित्रपट[संपादन]

चश्मे बद्दूर 1981

जाने भी दो यारों 1983

धत तेरे की 1983

अब आयेगा मजा 1984

अग्नीदाह 1985

पिछा करो 1986

घर संसार 1986

लव 1986

मैं बलवान 1986

जेवर 1987

त्रियात्री 1990

जान तेरे नाम 1992

कभी हां कभी नां 1993

रौनक 1993

लाडला 1994

रिटर्न ऑफ ज्वेल थिफ 1996

जब प्यार किसीसे होता है 1998

छोटा चेतन 1998

घर बाजार 1998

चल मेरे भाई 2000

प्यार तुने क्या किया 2001

द फिल्म 2005

बंटी और बबली 2005

लकीनो टाईम फॉर लव 2005

इट कुल्ड बी यू 2005

मॉनसून 2006

एंथनी कौन है 2006

युं होता तो क्या होता 2006

टीव्ही मालिका[संपादन]

इधर उधर 1985

एक से बढकर एक 1996

फुट्बॉल की वापसी

जस्ट मोहब्बत 1997

बाह्य दुवे[संपादन]

रवी बासवानी on IMDB

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Filmfare Award for Best Performance in a Comic Role". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-02-05.
  2. ^ "Ravi Baswani". ravibaswani.yolasite.com. 2020-05-12 रोजी पाहिले.
  3. ^ Jul 12, PTI |; 2004; Ist, 16:27. "FTII revives acting course after 26 years | Pune News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-05-12 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  4. ^ Jul 28, Bharati Dubey | TNN |; 2010; Ist, 03:02. "actor: The final shot: Actor Baswani succumbs to heart attack | Mumbai News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-05-12 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)

रवी बासवानी यांची शेवटची मुलाखत The Times of India