रवींद्रनाथ: तीन व्याख्याने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रविंद्रनाथ : तीन व्याख्याने हे मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यावरती दिलेली तीन व्याख्यानांचे पुस्तकरूप आहे.

यात त्यांनी रवींद्रनाथांच्या घरातील काला व त्या अनुषंगाने होणारे संस्कार, रवींद्रनाथांची नाटके, त्यांचे लेख, कविता यांवर साध्या सुटसुटीत भाषेत तरीही अत्यंत सखोल विश्लेषण केले आहे.