Jump to content

आश्विन कृष्ण एकादशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आश्विन कृष्ण एकादशी ही आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अकरावी तिथी आहे.


१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

हिंदू कालगणनेनुसार रमा एकादशी ही एक धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची तिथी मानली जाते. तमिळ पंचांगानुसार हा दिवस पुरातास्सी महिन्यात येतो.

स्वरूप

[संपादन]

कृष्णाच्या उपासनेसाठी ही तिथी महत्त्वाची मानली जाते.[] पूजा,उपवास आणि जागरण हे या व्रताचे स्वरूप आहे. पृथ्वी आणि परलोकात सुखाची प्राप्ती हे या व्रताचे फळ सांगितले गेले आहे.[] या व्रताने मोक्षप्राप्ती होते असे पद्म पुराण ग्रंथात सांगितले आहे.[] या दिवशी कृष्णाची पूजा केल्यानंतर भगवद्गीता या धार्मिक ग्रंथांचे पठण करावे असा संकेत रूढ आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ नवभारतटाइम्स.कॉम (2019-10-24). "Rama Ekadashi 2019 Vrat katha Muhurat: दिवाली से पहले रमा एकादशी, यह महत्व, व्रत कथा और मुहूर्त". नवभारत टाइम्स (हिंदी भाषेत). 2021-10-14 रोजी पाहिले.
  2. ^ जोशी ,होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२०११ पुनर्मुद्रण). भारतीय संस्कृती कोश खंड सातवा. पुणे: भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन. pp. ७२३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "Rama Ekadashi 2020: रमा एकादशी, इस व्रत को करने से होती है मोक्ष की प्राप्ति". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2021-10-14 रोजी पाहिले.
  4. ^ "Rama Ekadashi 2020 Vrat in Marathi धन-वैभवदायी रमा एकादशी : 'असे' करा व्रतपूजन; वाचा, महत्त्व व मान्यता". Maharashtra Times. 2021-10-31 रोजी पाहिले.