रमाकांत खलप
रमाकांत खलप ( ५ ऑगस्ट, इ.स. १९४६) हे गोव्यातील एक भारतीय राजकारणी आहेत. खलर हे ११ व्या लोकसभेचे सदस्य होते. ते गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. तसेच ते भारताचे कायदामंत्री सुद्धा राहिलेले आहेत.[१][२]
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचे १२ ऑगस्ट ,१९७३ रोजी निधन झाले. त्यानंतर ते विधानसभेत प्रतिनिधित्व करत असलेल्या मांद्रे विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक झाली. त्या पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाने रमाकांत खलप यांना उमेदवारी दिली. त्यात ते जिंकले. त्यानंतर ते १९७७, १९८०, १९८४, १९८९ आणि १९९९ च्या गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये मांद्रे विधानसभा मतदारसंघातून गोवा विधानसभेवर निवडून गेले. त्यांचा १९९४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या संगीता परब यांनी तर २००२ आणि २००७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पराभव केला. २००७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले.मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात पुनरागमन केले आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ "Ramakant Khalap turns 56 - Times of India". The Times of India. 2019-01-23 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". www.gpcc.co.in. 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-01-23 रोजी पाहिले.