रतिरहस्य
Appearance
रतिरहस्य हा कामशास्त्रावरील ग्रंथ आहे. कोक्कोक किंवा कोक नामक कवीने बाराव्या शतकापूर्वी लिहिला. पद्यात्मक असलेला हा ग्रंथ कोकशास्त्र नावानेच जास्त प्रसिद्ध आहे. याच ग्रंथाच्या नावावरूनच कामशास्त्रावरील कोणत्याही ग्रंथांस कोकशास्त्र हे सामान्यनाम लावण्यात येऊ लागले.