रजनी परुळेकर
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| जन्म तारीख | १६ जून 1945 |
| मृत्यू तारीख | ४ मे 2022 |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | मराठी |
| व्यवसाय | कवी |
रजनी परुळेकर (१६ जून, १९४५ - ४ मे, २०२२)[१] या मराठी कवयित्री होत्या. ऐंशीच्या दशकातील रजनी परुळेकर या महत्त्वाच्या कवयित्री ठरतात. मराठी कवितेत आशय आणि आविष्काराच्या अंगाने महत्त्वाची भर रजनी परुळेकरांच्या कवितेने घातली.
परुळेकर यांचे जन्मस्थळ पावस (जिल्हा रत्नागिरी) असून त्यांचे माध्यमिक शिक्षण मुंबई येथे झाले. एम. ए. पर्यंत उच्च शिक्षण त्यांनी मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. मुंबईतल्या बुऱ्हाणी महाविद्यालयात त्यांनी मराठी अध्यापनाचे कार्य केले.
परुळेकर यांचे दीर्घकविता (१९८५), काही दीर्घ कविता (१९९३), स्वीकार (१९९३), चित्र (१९९६), पुन्हा दीर्घकविता (१९९९) हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. पुरुषकेंद्री कवितेला छेद देत रजनी परुळेकर यांनी आत्मभान व्यक्त करणारी कविता लिहून स्त्रियांचे भावविश्व पारदर्शीपणे कवितेतून व्यक्त केले आहे.[२]
पुरस्कार
[संपादन]परुळेकर यांच्या दीर्घ कविता संग्रहाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार, स्वीकार या संग्रहाला कवी कुसुमाग्रज पुरस्कार तसेच चित्र या संग्रहाला ना.धो. महानोर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कविता दशकाची या उपक्रमात त्यांची कविता समाविष्ट होती.[२]
बाह्य दुवे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "ज्येष्ठ कवयित्री रजनी परुळेकर यांचे निधन". Maharashtra Times. 2022-05-06. 2026-06-16 रोजी पाहिले.
- 1 2 "रजनी परुळेकर". मराठी विश्वकोश. १६ जून २०२६ रोजी पाहिले.