योहान वोल्फगांग फोन गटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

योहान वोल्फगांग फोन गटे हा एक जर्मन महाकवी होता. गटे हा संस्कृत साहित्य आणि विशेषतः कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलने प्रभावित झाला होता.

गटेचे वडील वकील होते तर आई सरदार घराण्यातील होती. आई तिच्या पतीपेक्षा २२ वर्षांनी लहान होती. गटेच्या घरात एक विशाल ग्रंथालय आणि उत्तम चित्रसंग्रह होता.

लहानपणीच वडिलांनी योहानला लॅटिन आणि ग्रीक भाषा शिकवल्या. योहानने वयाच्या अकराव्या वर्षीच सात भाषांत एक कादंबरी लिहिली. गटे विचाराने बंडखोर होता. चौदाव्या वर्षी तो प्रेमात पडला. बेभान वागत तो लीपझिग विद्यापीठात शिकायला गेला. तिथे आजारी पडला आणि मरतामरता वाचला.

गटेने लिहिलेले साहित्य[संपादन]

  • गॉट्झ (ऐतिहासिक नाटक)
  • तरुण वर्टरची दुःखे (कादंबरी) : या कादंबरीच्या अल्पावधीतच १६ आवृत्त्या निघाल्या.
  • पोएट्री ॲन्ड ट्रुथ(काव्यसंग्रह)
  • फॉस्ट (नाटक)