योश्कार-ओला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

योश्कार-ओला (मारी: Йошкар-Ола;लाल शहर) रशियाच्या मारी एल प्रजासत्ताकातील शहर आहे. प्रजासत्ताकाचे प्रशाकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,४८,७८२ होती.

हे शहर मालाया कोकशेगा नदीकाठी वसलेले आहे.

१९१९पूर्वी या शहराला त्सार्योवोकोकशेस्क आणि १९१९-१९२७ दरम्यान क्रास्नोकोकशेस्क अशी नावे होती.

योश्कार-ओला विमानतळापासून मॉस्को-व्नुकोव्हो विमानतळापर्यंत सेवा उपलब्ध आहे. येथून रोज एकदा मॉस्कोपर्यंत रेल्वेसेवा उपलब्ध आहे.