योगीराज बागूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

'योगीराज बागूल' हे मराठी साहित्यिक आहेत. ते अतिशय गरीब कुटुंबातून आले असून परिस्थितीशी निकाराचा संघर्ष करुन त्यांनी आयुष्याला आकार दिला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य हा बागूलांचा अभ्यासाचा मुख्य विषय असला तरी त्यांनी इतरही विषयांना स्पर्श केला आहे. बागूल यांनी लिहिलेली पुस्तके अनेक विद्यापीठांमध्ये आणि संस्थांमध्ये अभ्यासक्रमासाठी आहेत. बागूल यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे.

लेखन[संपादन]

बागूल यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांची यादी खालीलप्रमाणे आहे:[१]

  • प्रिय रामू[२]
  • ही वाट सुनसान कशी?
  • पाचट
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी
  • तमाशा : विठाबाईच्या आयुष्याचा
  • आठवणीतले बाबासाहेब
  • डॉ. बी. आर. आंबेडकर रेमनिसन्सिज बाय हिज क्लोज असोसिएट्स[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5475086100264550193
  2. ^ https://www.loksatta.com/lekha-news/priya-ramu-book-by-yogiraj-bagul-1594849/
  3. ^ https://maharashtratimes.com/editorial/literature/dr-br-ambedkar-reminiscences-by-his-close-associates-book-review/articleshow/72296043.cms