Jump to content

युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेलबर्न विद्यापीठ
द युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न
ब्रीदवाक्य पोस्टेरा क्रेस्कॅम लाउडे
मराठीमध्ये अर्थ
भविष्यातील पिढ्यांच्या नजरेत माझे महत्त्व वाढो
Type सार्वजनिक
स्थापना १८५३
विद्यार्थी ४५,४११
संकेतस्थळ [unimelb.edu.au]मेलबर्न विद्यापीठ (Melbourne University) ही ऑस्ट्रेलियातल्या, व्हिक्टोरिया राज्यातील मेलबर्न शहरात इ.स. १८५३ साली स्थापन झालेली शिक्षणसंस्था आहे. ऑस्ट्रेलियामधील प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय विद्यापीठ असलेले मेलबर्न विद्यापीठ हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंगनुसार जगातले एकोणचाळीसव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे.ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिया राज्याची राजधानी असलेल्या मेलबर्न शहरामध्ये हे विद्यापीठ स्थित आहे. या विद्यापीठाची स्थापना १८५३ साली करण्यात आली. ऑस्ट्रेलियामधील जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेले मेलबर्न विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. मेलबर्न विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस शहरामधील पार्कविले या भागात आहे. विद्यापीठाचे इतर अनेक कॅम्पस व्हिक्टोरिया राज्यातच ठिकठिकाणी आहेत.'भविष्यातील पिढ्यांच्या नजरेत माझे महत्त्व वाढो' हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. मेलबर्न विद्यापीठामध्ये सध्या जवळपास साडे चार हजार तज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून पन्नास हजारपेक्षाही अधिक पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाशी संलग्न दहा महाविद्यालये ही विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्येच स्थित आहेत. या कॅम्पसमध्ये दहा मुख्य शैक्षणिक-संशोधन विभाग, पंधरा ग्रॅज्युएट स्कूल्स, विद्यापीठाशी संलग्न संशोधन संस्था आणि इतर अनेक छोटीमोठी शैक्षणिक केंद्रदेखील आहेत.