युजीन, ओरेगन
Jump to navigation
Jump to search
युजीन हे अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील प्रमुख शहर आहे. हे शहर विलामेट आणि मॅककेन्झी नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.
२०१४च्या अंदाजाप्रमाणे येथील लोकसंख्या १,६०,५६१ होती.
या शहराला तेथे सर्वप्रथम घर बांधणाऱ्या युजीन फ्रॅंकलीन स्किनरचे नाव देण्यात आले आहे. सुरुवातीस हे नाव युजीन्स मडहोल असे होते. ८ जानेवारी, इ.स. १८५० रोजी येथे पोस्ट ऑफिस आले तेव्हा हे नाव बदलून युजीन सिटी असे झाले. १८८९मध्ये शहराचे युजीन असे पुनर्नामकरण करण्यात आले.