Jump to content

युकॉन नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

युकॉन नदी उत्तर अमेरिकेच्या वायव्य भागातील मोठी नदी आहे. ब्रिटिश कोलंबियातील लेवेलिन हिमनदीत उगम पावणारी ही नदी युकॉन प्रांतातून वाहत अमेरिकेच्या अलास्का राज्यात जाते व बेरिंग समुद्रास मिळते. क्लॉन्डाइक नदी युकॉनची उपनदी आहे.

३,१९० किमी लांबीच्या या नदीचे खोरे ३,२३,८०० किमी² क्षेत्रफळाचे असून अमेरिकेच्या टेक्सास राज्याच्या विस्तारापेक्षा २५% मोठे आहे.