युएफा युरोपा लीग
Appearance
(युएफा कप या पानावरून पुनर्निर्देशित)
युएफा युरोपा लीग | |
---|---|
खेळ | फुटबॉल |
प्रारंभ | इ.स. १९७१ |
प्रथम हंगाम | १९५५-५६ |
संघ |
४८ (साखळी फेरी) १६० (एकूण) |
खंड | युरोप (युएफा) |
सद्य विजेता संघ | ॲटलेटिको माद्रिद (दुसरे अजिंक्यपद) |
सर्वाधिक यशस्वी संघ |
युव्हेन्टस एफ.सी. इंटर मिलान लिव्हरपूल एफ.सी. (३ वेळा) |
संकेतस्थळ | uefa.com/uefaeuropaleague/ |
युएफा युरोपा लीग (इंग्लिश: UEFA Europa League; मागील नाव: युएफा कप) ही युरोपमधील एक फुटबॉल स्पर्धा आहे. युएफा ही युरोपामधील संस्था दरवर्षी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. युएफा चॅंपियन्स लीग खालोखाल ही युरोपामधील सर्वात लोकप्रिय वार्षिक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेमध्ये पात्रता मिळवण्यासाठी युरोपीय क्लबांना आपापल्या देशांच्या लीगमध्ये चांगले प्रदर्शन द्यावे लागते.
आजवर एकूण २६ विविध क्लबांनी ही स्पर्धा जिंकली आहे. युव्हेन्टस एफ.सी., इंटर मिलान व लिव्हरपूल एफ.सी. ह्या संघांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ३ वेळा) ह्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवण्याचा विक्रम केला आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत