Jump to content

म.टा. सन्मान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी चित्रपट/नाटक/दूरचित्रवाणी कार्यक्रम आणि त्यांतील कलावंत आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी महाराष्ट्र टाइम्स आणि ’कोहिनूर’ दरवर्षी ’कोहिनूर मटा सन्मान’ पुरस्कार जाहीर करतात.

इ.स. २०१३ सालचे कोहिनूर मटा पुरस्कार मिळालेले पुरस्कारार्थी

चित्रपट विभागात ' धग ', नाटक विभागात ' प्रपोजल '; तर टीव्ही विभागात ' गुंडा पुरुष देव ' अव्वल ठरले आहेत. ' जयश्री मोशन पिक्चर्स 'ची निर्मिती असलेल्या ' धग ' ने सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्री, साहाय्यक अभिनेता, पटकथा, बालकलाकार अशा सर्वाधिक सहा आघाड्यांवर बाजी मारली. नाटक विभागात ' प्रपोजल ' ने सर्वोत्कृष्ट निर्मितीसह सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, नेपथ्य, प्रकाशयोजना , सर्वोत्कृष्ट संगीत अशा पाच आघाड्यांवर बाजी मारली. तर, ' गुंडा पुरुष देव ' या मालिकेने टीव्ही विभागात सर्वाधिक पुरस्कारांवर आपली नाममुद्रा उमटवली.

चित्रवाणी मालिका

[संपादन]
  • सर्वोत्कृष्ट मालिका - गुंडा पुरुष देव, (इंडियन मॅजिक आय. प्रा. लि.)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक -विनोद लव्हेकर, अवधूत कदम, (गुंडा पुरुष देव)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता -मोहन जोशी, (गुंडा पुरुष देव)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - खुशबू तावडे, (एक मोहर अबोल)
  • सर्वोत्कृष्ट पटकथा - समीर जोशी, (गुंडा पुरुष देव)
  • सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री - सुरेखा कुडची, (देवयानी)
  • सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता - मनोज कोल्हटकर, (कालाय तस्मै नम:)
  • सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - कुमार गौडा, (कालाय तस्मै नम:)
  • सर्वोत्कृष्ट संकलन - नरपत चौधरी, (लक्ष्य)
  • सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत - गुंडा पुरुष देव

चित्रपट विभाग

[संपादन]
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट - धग (जयश्री मोशन पिक्चर्स)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - शिवाजी लोटन पाटील (धग)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - पद्मनाभ बिंड (श्री पार्टनर)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - उषा जाधव (धग)
  • सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री - वीणा जामकर, (तुकाराम)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - उपेंद्र लिमये, (धग)
  • सर्वोत्कृष्ट बालकलाकार- हंसराज जगताप (धग)
  • सर्वोत्कृष्ट पटकथा - नितीन दीक्षित (धग)
  • सर्वोत्कृष्ट संवाद- कै. व.पु. काळे (श्री पार्टनर) व संजय पवार (भारतीय) यांना विभागून
  • सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - महेश लिमये, (बीपी)
  • सर्वोत्कृष्ट गीत-गुरू ठाकूर, गीत : शोधून शिणला जीव आत रे, (भारतीय)
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - सोहम-आदित्य-निखिल (श्यामचे वडील)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक -हरिहरन, गीत : कोरडं आभाळ पोळणारी माती (तुकाराम )
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - ऊर्मिला धनगर व कल्याणी साळुंके, गीत : जगजेठी (अजिंठा)
  • सर्वोत्कृष्ट संकलन - जयंत जठार (बीपी)

नाटक विभाग

[संपादन]
व्यावसायिक नाटकः
  • सर्वोत्कृष्ट नाटक - प्रपोजल
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - निखिल रत्नपारखी (टॉम अँड जेरी)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता-निखिल रत्नपारखी ( टॉम अँड जेरी)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आदिती सारंगधर (प्रपोजल)
  • सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता - चिन्मय केळकर (गांधी आडवा येतो)
  • सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री - नेहा जोशी (बेचकी)
  • सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिका - सागर कारंडे (झोलबच्चन)
  • सर्वोत्कृष्ट लेखक - राजकुमार तांगडे ( शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला)
  • सर्वोत्कृष्ट नेपथ्य - प्रदीप मुळ्ये (प्रपोजल)
  • सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना - प्रदीप मुळ्ये (प्रपोजल)
  • सर्वोत्कृष्ट संगीत - राहुल रानडे (प्रपोजल)
प्रायोगिक नाटकः
  • सर्वोत्कृष्ट नाटक - अडगळ (अद्वैत थिएटर्स)