मोहम्मद ताहीर उल कादरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोहम्मद ताहीर उल कादरी (उर्दू: محمد طاہر القادری) हे सुफी विचारवंत आहेत. पाकिस्तानातील तेहरीक मिनाज अल कुर्आन पार्टीचे नेते असलेल्या कादरी यांनी कॅनडाचे नागरिकत्व घेतलेले आहे. पाकिस्तानमध्ये केंद्र आणि प्रांतिक सरकारे बरखास्त करून राजकीय सुधारणांची मागणी करण्यासाठी कादरी यांनी इस्लामाबादमधील जिना अव्हेन्यू येथे आपल्या हजारो समर्थकांसह २०१३ मध्ये आंदोलन सुरू केले. पाकिस्तानात राजकीय सुधारणा करव्यात, निवडणूक आयोग बरखास्त करावा, लष्कर आणि न्यायसंस्था यांच्याशी चर्चा करून काळजीवाहू सरकार स्थापन करावे, अशा मागण्या कादरी यांनी त्या वेळी केल्या.