मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. ह्या योजनेअंतर्गत, दिव्यांग नागरिकांना मोफत इलेक्ट्रिक वाहने प्रदान केली जातात, ज्यावर फिरते दुकान असते. ही योजना दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आणि चळवळीसाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.

योजनेचे मुद्दे[संपादन]

  • दिव्यांग नागरिकांना मोफत विद्युच्चलित वाहने प्रदान केली जातात.
  • या वाहनांवर फिरते दुकान असते.
  • ही योजना दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आणि समर्थन प्रदान करण्यासाठी आहे.
  • अर्ज करणाऱ्यांनी वाहनाची योग्य देखभाल करण्याची प्रतिज्ञा करणे आवश्यक आहे आणि ते शासकीय/अर्धशासकीय/मंडळे/महामंडळे यांचे कर्मचारी नसावेत.
  • अर्जदाराने दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे कर्ज असेल तर तो थकबाकीदार नसावा.

योजनेच्या अटी व शर्ती[संपादन]

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्रधारक असावा.
  • अर्जदारा कडे दिव्यांगत्वाचे (100 प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  • अर्जदारदि.०१.०१.२०२४ या अहर्ता दिनांकाच्या दिवशी १८ ते ५५ या वयोगटातील असावा.
  • मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील.
  • दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्नरु. २.५० लाख पेक्षा अधिक नसावे.
  • लाभार्थी निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रम हा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील.
  • अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याच्या सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.
  • अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्यती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील.
  • अर्जाचा वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल.
  • अर्जदार हा शासकीय/निमञासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा.
  • या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा.

आवश्यक कागदपत्र[संपादन]

क्रमांक कागदपत्र आवश्यक आहे का?
1 अर्जदाराचा फोटो होय
2 अर्जदाराची सही होय
3 जातीचा दाखला/ आवश्यकतेनुसार
4 अधिवास प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार
5 निवासी पुरावा आवश्यकतेनुसार
6 दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार
7 UDID प्रमाणपत्र
8 ओळखपत्र होय
9 बँक पासबुकचे पहिले पान आवश्यकतेनुसार
10 अर्जदाराचे प्रतिज्ञापत्रक होय

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत खालील स्टेप्स वापरून अर्ज करा[संपादन]

  • सूचना वाचणे
  • प्रथमच वापरकर्त्याची नोंदणी (साइन-अप)
  • एप्लिकेशन पोर्टलवर लॉगिन (साइन-इन) करणे
  • अर्ज भरणे आणि कागदपत्रे अपलोड करणे
  • फॉर्मचे पुनरावलोकन करणे, घोषणा तपासणे आणि फॉर्म सबमिट करणे
  • अर्ज ऑनलाईन सबमिट झाल्यावर पोचपावती डाउनलोड करावी.