मोतीबिंदू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मोतीबिंदू झालेला नेत्रमणी

मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय. सामान्य डोळ्यात प्रकाशकिरण पारदर्शक भिंगाद्वारे मागील पडद्यावर केंद्रित होतात. उत्तम दृष्टीकरिता नैसर्गिक भिंग (लेन्स) पूर्णतः पारदर्शक असणे आवश्‍यक असते. जेव्हा या लेन्सची पारदर्शकता मोतीबिंदू झाल्याने कमी होते तेव्हा रुग्णास अंधूक दिसू लागते. मोतीबिंदू अर्थात लेन्सला आलेला गढूळपणा काळानुसार वाढतच जातो व रुग्णास अधिकाधिक अस्पष्ट दिसू लागते. नेत्रमणी हा बहुतांशी प्रथिने व न्यूक्लिक आम्ल या जैविक रसायनांपासून बनलेला असतो. यात काही कारणांनी बदल झाल्यास नेत्रमण्यांची पारदर्शकता कमी होत जाते. त्यामुळे दृष्टी कमी होते. नेत्रमण्याच्या कोणत्याही भागास पारदर्शकत्व आले तर त्याला मोतीबिंदू असे म्हणतात.

कारणे[संपादन]

 • बरीच वर्षे कामासाठी किंवा काही नेहेमीच्या प्रसंगी सतत प्रखर प्रकाशाला सामोरे गेल्यास.
 • मधुमेह
 • दम्यासाठी स्टिरॉईड घेणे.
 • धुम्रपान किंवा दारू पिणे.
 • जन्मतःच मोतीबिंदू असल्यास.
 • ग्लॉकोमासारखी डोळ्यांची इतर समस्या असल्यास.

लक्षणे[संपादन]

 • डोळ्यांच्या बाहुल्या धुरकट किंवा सफेद होणे. डोळ्यांच्या मध्यभागी असणारा काळा गोल म्हणजे बाहुली.
 • रंग फिक्कट दिसतात.
 • सर्व काही अस्पष्ठ दिसते.
 • प्रकाशामुळे डोळे दुखतात व प्रकाश अतिप्रखर वाटतो.
 • रात्रीच्या वेळी प्रकाशाभोवती वलये दिसतात.
 • एका डोळ्याने दुहेरी दिसणे.
 • रात्रीच्या वेळी स्पष्ट न दिसणे.
 • चष्म्याची किंवा दृष्टीची औषधपत्रे सतत बदलणे.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.