मेमदावाद
Appearance
मेमदावाद तथा महेमदावाद किंवा महमूदाबाद हे भारताच्या गुजरात राज्यातील शहर आहे. हे शहर सोळाव्या शतकातील मुझफ्फरी सुलतान महमूद बेगड्याने वसवले होते. वात्रक नदीकाठी असलेल्या या शहरात अनेक ऐतिहासिक इमारती आहेत. या इमारती इस्लामी स्थापत्यशास्त्रानुसार बांधल्या गेल्या आहेत.
मेमदावाद मुंबई-अहमदाबाद लोहमार्गावरील स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या जलद गाड्या येथे थांबतात.