मेड्सें सां फ्रंटियेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एमएसएफचे प्रकल्प असलेले देश

मेड्सें सां फ्रंटियेर, एमएसएफ तथा डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स ही आंतरराष्ट्रीय वैद्यकीय सेवाभावी संस्था आहे. जिनीव्हामध्ये मुख्यालय असलेल्या या बहुराष्ट्रीय संस्थेची स्थापना २० डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी फ्रांसमध्ये झाली. अविकसित, विकसनशील देशांमध्ये तसेच युद्ध आणि नैसर्गिक आपत्तिग्रस्त प्रदेशांमध्ये पसरेल्या रोगराईस तोंड देण्यासाठी आपले स्वयंसेवक तसेच इतर मदत घेउन जाणाऱ्या या संस्थेस इ.स. १९९९चे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले. इ.स. २००७ साली २६,००० डॉक्टर, परिचारक, इतर वैद्यकीय व्यावसायिक, व्यवस्थापक, पाणि आणि स्वच्छता अभियंते यांनी मोबदला न घेता ६० देशांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवली. या संस्थेला मिळणाऱ्या दानांतील ८०% संपत्ती व्यक्तिशः दान असतात तर इतर २०% अनेक देशांतील सरकारे, कंपन्या आणि संस्थांकडून मिळतात. एमएसएफचा वार्षिक लेखा ४० कोटी अमेरिकन डॉलरच्या घरात असतो.[१]

आपण कार्यरत असलेल्या प्रदेशांमध्ये काम करीत असताना तेथे चाललेल्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीकडे दुर्लक्ष न करता त्यावर भाष्य करण्याचे एमएसएफचे धोरण आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Forsythe, David P. (2005) The Humanitarians: The International Committee of the Red Cross, Cambridge University Press. ISBN 0-521-61281-0.