Jump to content

मेडेन्स हॉटेल (दिल्ली)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मेडेनस हॉटेल, दिल्ली या पानावरून पुनर्निर्देशित)
मेडेन्स हॉटेल, दिल्ली

मेडेन्स हॉटेल हे भारताच्या दिल्ली शहरातील एक हॉटेल आहे. याला ऑबेरॉय मेडेन्स हॉटेल असेही म्हणतात. हे मेडेन्स मेट्रोपोलिटन हॉटेल एक ऐतिहासिक हॉटेल आहे. दिल्ली मधील १९०३ मध्ये सर्वांत जुने पण अत्याधुनिक सोयींनी युक्त असे ते हॉटेल होते. ब्रिटिशांच्या काळात अधिकाऱ्यांचे निवासस्थान या ठिकाणी होते आणि ते गेल्यानंतर त्याचे रूपांतर हॉटेलमध्ये करण्यात आलेले होते. हे युरोपियन पद्धतीचे हॉटेल आहे.[][]

इतिहास

[संपादन]

१८९४ पासून मेडन बंधूनी - ब्रिटिशांनी या हॉटेलचे बांधकाम हाती घेतले. १९०२ पासून जे.मेडन यांनी सध्या उभं असलेले हॉटेल बांधलेले आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस दिल्लीमधील सर्वोत्कृष्ट हॉटेल म्हणून ते नावारूपाला आलेले आहे. १९०३ मध्ये लॉर्ड कर्झनने भरविलेल्या भारताचा राजपुत्र सातव्या एडवर्ड याच्या राज्याभिषेकाच्या वेळेस या हॉटेलमध्ये दरबार भरविण्यात आलेला असून या हॉटेलमध्ये सर्व अभ्यागतांची राहण्याची व्यवस्था केलेली होती.[]

सध्या ऑबेराय हॉटेल आणि रीझोर्ट चेनचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.[]

निवास व्यवस्था

[संपादन]

हॉटेलमधील राहण्याची व्यवस्था अत्यंत महागडी असून प्रत्येक कक्ष वातानुकूलित आहे. मिनीपेयपानगृह, २४ तास सॅटलाईट चॅनेल्स, वायरलेस इंटरनेट, थेट दूरध्वनीवरून संदेश इ. सुविधा अभ्यागतांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत.[]

याव्यतिरिक्त खालील वैशिष्टयपूर्ण सुविधा या हॉटेलमध्ये आहेत.[]

  • मिनरल पाण्याची बाटली
  • बिस्किटे / फळांचे बास्केट
  • तरणतलाव

ऐतिहासिक कक्ष

[संपादन]

हॉटेलच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर हा कक्ष असून या कक्षामधील खोल्या विशाल आणि अवाढव्य आहेत. या कक्षातील वास्तुशास्त्र ब्रिटिशकालीन पद्धतीने बांधण्यात आलेले असल्यामुळे ते १९ व्या शतकातील ब्रिटिशकालीन राजवटीची आठवण करून देते. या कक्षामध्ये भव्य असे हिरव्यागार गवताचे लॉन आणि तरणतलाव आहे.

प्रिमिअर कक्ष

[संपादन]

४५०-५०० चौ.फुट आकाराच्या प्रिमिअर कक्षाचे बांधकाम हल्लीचेच असले तरीही जुन्या काळातील बांधकामाप्रमाणे असल्यामुळे त्या काळाची आठवण करून देणारे आहे. या कक्षामध्ये ३७ इंच एलसीडी टी.व्ही, ४ आलिशान प्रशाधनगृह आहेत.

डिलक्स कक्ष

[संपादन]

७००-८०० चौ.फुट आकाराच्या डिलक्स कक्षाचे बांधकाम हल्लीचेचे असले तरीही बांधकाम ब्रिटिशकालीन पद्धतीने केलेले आहे. या कक्षामध्ये सुद्धा एलसीडी टी.व्ही, ४ आलिशान प्रसाधनगृह आहेत.

ऐषआरामी कक्ष

[संपादन]

९००-१४०० चौ.फुट आकाराच्या लक्झरी कक्षाचे बांधकाम करताना त्याचे ऐतिहासिक महत्त्व कायम ठेवण्याचा लक्षणीय प्रयत्न केलेला आहे. या कक्षामध्ये सुद्धा ४ आलिशान प्रसाधनगृह, ३७ इंच एलसीडी टी.व्हि. सारख्या सुविधा दिलेल्या आहेत.

डायनिंग

[संपादन]

कर्झन कक्ष

[संपादन]

ब्रिटिश लॉर्ड कर्झन याच्या नांवावरून या कक्षाला कर्झन असे नामकरण करण्यात आलेले आहे. ब्रिटिशकानलीन राजवटीतील ७० पेक्षा जास्त छायाचित्रे या कक्षाच्या भिंतीवर लावण्यात आलेली असून ती पहाताना इ.स.पूर्व १९०० च्या कालावधीतील ब्रिटिश साम्राज्याची आठवण आल्याशिवाय राहात नाही. युरोपियन आणि भारतीय अशा दोन्ही पद्धतीचे जेवण येथे उपलब्ध आहे. दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ७.३० ते ११ वाजेपर्यंत या कक्षामध्ये प्रवेश दिला जात असून एका वेळी ४५ जण या कक्षाचा आनंद घेउू शकतात.

गार्डन टेरेस

[संपादन]

या ठिकाणी एक कॉफि पेयपान असून येथील वातावरण अतिशय निसर्गरम्य आहे. अभ्यागतांना येथे पुस्तके वाचण्याची आणि गप्पा करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. भारतीय आणि युरोपियन अशा दोन्ही पद्धतीने अभ्यागतांना येथे पेय करून दिले जाते. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ११ पर्यंत येथे प्रवेश दिला जातो. एका वेळी ५२ जण या कक्षाचा आनंद घेउु शकतात.

कॅव्हलरी बार

[संपादन]

१९ व्या शतकातील बार असून तो आकाराने अतिशय लहान आहे. येथील वातावरण अतिशय सुखकारक आणि आल्हाददायक असून मागणी केल्याप्रमाणे मदय उपलब्ध करून दिले जाते. सकाळी ११ वाजल्यापासून मध्यरात्री १२ पर्यंत येथे प्रवेश दिला जातो. एका वेळी २२ जण या कक्षाचा आनंद घेउु शकतात.

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "नवी दिल्ली येथील नवीन निवासस्थान.[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्लिश भाषेत). 2011-08-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-02-14 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ फॅनशॉ, हरर्बट चार्ल्स (१९०८). "भारतामधील प्रवासासाठी हॅंडबुक, बर्मा आणि सिलोन : आणि इतर शहरे, जे मरे" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "मेडेन्स हॉटेल व्हिडिओ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "'इतर हॉटेल समूह'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "हॉटेलची वैशिष्ट" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "हॉटेलमध्ये राहण्याची सोय" (इंग्लिश भाषेत). 2014-03-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-02-14 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)