कौस्तुभ राणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मेजर कौस्तुभ राणे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
मेजर कौस्तुभ राणे
200px
टोपणनाव: मेजर कौस्तुभ राणे
संघटना: भारतीय सेना
पुरस्कार: सेना मेडल
प्रमुख स्मारके: मुंबई
तळटिपा: शहीद जवान
Subhash Ramrao Bhamre paying homage to Maj. Kaustubh Prakash Rane, Rfn. Hameer Singh, Rfn. Mandeep Singh Rawat and Gnr. (DMT) Vikram Jeet Singh, who laid their lives in the line of duty in J&K, at Palam Technical Area.JPG

मेजर कौस्तुभ राणे भारतीय सैन्यातील सैनिक होते. हे काश्मीरमध्ये आतंकवादींशी लढताना शहीद झाले.

विस्तार[संपादन]

मेजर कौस्तुभ राणे[१] यांनी मीरा रोडच्या होली क्रॉस स्कूलमध्ये शिक्षण घेतले. ते मीरा रोडच्या रावल ज्युनियर कॉलेजमध्ये होते. मीरारोडच्या शीतल नगर येथील हिरल सागर इमारतीत पहिल्या मजल्यावर राणे कुटुंब राहते. ते मूळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत. पण, अनेक वर्षांपासून मीरारोड परिसरात आहेत.

सारांश[संपादन]

सोमवारी (कोणता सोमवार??) रात्रीपासूनच घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी भारतीय जवानांचा लढा सुरू होता. आज सकाळी मेजर राणेंसह तीन जवान शहीद झाल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले. मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याचे वृत्त समजताच परिसरात (कोणत्या?) शोककळा पसरली आहे. याच(?) भागात कौस्तुभ राणे लहानाचे मोठे झाले. येथील हॉली क्रॉस शाळेत त्यांनी आपले शिक्षण घेतले होते. तर त्यांचे वडीलही राणे काका म्हणून या भागात सुपरिचित आहेत. कौस्तुभ यांचे वडील टाटा कंपनीत तर आई ज्योती या बोरिवलीच्या गोखले शैक्षणिक संस्थेत होत्या. सध्या दोघेही निवृत्त आहेत. तर कौस्तुभ यांच्या पत्नी कनिका व अडीच वर्षांचा मुलगाही येथेच(?) राहायला आहेत. पत्नी कनिका मुलास घेऊन गावी गेल्या होत्या तर आई-वडीलही गावी जायच्या तयारीत होते.

सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

कौस्तुभ यांना यंदा(?) सेना मेडल या पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

अवश्य पहा[संपादन]

  1. ^
    "Major Kaustubh Rane: शहीद मेजर कौस्तुभ राणे को इसी साल मिला था प्रमोशन, कैप्टन से बने थे मेजर - major kaustubh rane killed in loc in north kashmir". Navbharat Times (hi मजकूर). 2018-08-08. 2019-11-02 रोजी पाहिले.