मेंगाई
Appearance
पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावची मुख्य ग्राम देवता मेंगाई आहे. तिचा अधिवास तोरण्यावर होता. शिवाजी महाराजांनी तोरण्यावर (तेव्हाचा प्रचंडगडावर) जाऊन या देवीचे दर्शन घेतल्याची ऐतिहासिक नोंद आहे. तिचे देऊळ तोरणा किल्यावर व तोरण्याच्या पायथ्याशी आहे. सन २०१५ मध्ये पायथ्या पाशी असणाऱ्या देवीच्या देवळाचा जीर्णोद्धार झाला.
देवीची यात्रा माघ महिन्यातील शुक्रवारी असते. गावातील लोकं पालखीतून देवीची मिरवणूक काढतात. या मेंगाई देवीच्या यात्रेत किमान ४० पेक्षा जास्त गावातील लोकं सहभागी होतात. देवीच्या यात्रेतील बाजार मुख्यतः घोंगडी व मिरची या वस्तूचा असतो. देवीच्या यात्रेत पारंपारिक खेळ सदरी करणाची पद्धत आहे, आता तिथल्या कुस्त्या प्रसिद्ध आहेत.