मॅथ्यू फ्लिंडर्स
Appearance
कॅप्टन मॅथ्यू फ्लिंडर्स (मार्च १६, इ.स. १७७४:डॉनिंग्टन, लिंकनशायर, इंग्लंड - जुलै १९, इ.स. १८१४) हा दर्यावर्दी खलाशी होता. याने ऑस्ट्रेलियाचा पहिला नकाशा इ.स. १८००च्या सुमारास काढला. त्यासाठी त्याला १ वर्ष लागले. त्यानेच या खंडाला ऑस्ट्रेलिया हे नाव दिले. त्याने या खंडाची त्याच्या पथका समवेत एका गळक्या बोटीतून फेरी केली. या बोटीचे नाव टॉम्स थम्ब असे होते. त्याने तास्मानिया हे बेट आहे असे दाखवून दिले.
त्याच्या बायकोचे नाव ऍन असे होते. हा प्रवास पूर्णं झाल्यावर त्याने एक पुस्तकही लिहिले. या पुस्तकाचे नाव अ व्हॉयेज टू टेरा ऑस्ट्रालिस असे होते.
बालपण
[संपादन]फ्लिंडर्सने रॉबिन्सन क्रुसो हे पुस्तक वाचल्यावर आपणही समुद्रावर जावे असे वाटले व त्यामुळे इ.स. १७८९मध्ये पंधराव्या वर्षी तो रॉयल नेव्हीमध्ये रुजू झाला.